टीम इंडियाच्या फिरकीपटूला कोरोनाचा विळखा , दुसरा टी-२० सामना स्थगित 

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० सामन्यावर कोरोनाने विळखा घातला आहे. त्यामुळे बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळं दोन्ही संघांना आयसोलेट करण्यात आले आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तरच आज स्थगित झालेला दुसरा टी-२० सामना उद्या (बुधवारी) खेळला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    कोलंबो : टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये आज दुसऱ्या टी-२० सामन्याचा थरार होणार होता. परंतु टीम इंडियाचा फिरकीपटू क्रृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाली असून हा सामना स्थगित करण्यात आला आहे. बीसीसीआयने ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार, क्रृणाल पांड्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आजचा सामना स्थगित करण्यात आला असून हा सामना उद्या २८ जुलै (बुधवार) खेळवण्यात येणार आहे.

    मंगळवारी सकाळी सर्व खेळाडूंची Rapid Antigen Tests करण्यात आली. यामध्ये टीम इंडियाचा फिरकीपटू क्रृणाल पांड्याचा अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे वैद्यकिय टीमनं कृणालच्या संपर्कात ८ खेळाडू आल्याचे सांगितले आहे आणि ते विलगिकरणात आहेत. त्यामुळे आता सर्वच खेळाडूंची RT-PCR टेस्ट होणार आहे. त्याचा रिपोर्ट लवकरच जाहीर केला जाईल.

    टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० सामन्यावर कोरोनाने विळखा घातला आहे. त्यामुळे बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळं दोन्ही संघांना आयसोलेट करण्यात आले आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तरच आज स्थगित झालेला दुसरा टी-२० सामना उद्या (बुधवारी) खेळला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेचा २-१ ने पराभव केला. त्यानंतर टी-२० सामन्याला आता सुरूवात झाली असून पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेला पुन्हा एकदा झटका दिला. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं १-० अशी आघाडी घेतली आहे.

    आज टी-२० मालिकेचा दुसरा सामना खेळवण्यात येणार होता. परंतु फिरकीपटू क्रृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने हा सामना स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तसेच हा सामना उद्या खेळवण्यात येणार आहे.

    तुम्हाला या बातमी बद्दल काय वाटते? ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…