मोठी बातमी! विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता, दोघांमध्ये काय झालं बोलणं?

विराट कोेहलीने कर्णधारपदाबाबत  मोठा निर्णय घेतला असून टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. विराटनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता अधिकपटीने वर्तवली जात आहे. रोहितकडे टीम इंडियाची धुरा सांभाळण्यास दिली तर जवळपास 78.94 टक्के टीम विजयी ठरू शकते. असं सांगितलं जात आहे. 

    टीम इंडियामधून अनेक प्रकारच्या घडामोडी समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आपलं कर्णधार पद सोडणार असल्याची चर्चा रंगत होती. परंतु या चर्चेला आता फुलस्टॉप लागला आहे. टी-20 वर्ल्डकपनंतर विराट कोहली आपलं कर्णधारपद सोडणार आहे. तसेच टी-20 वर्ल्डकप नंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार संपणार आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यापर्यंत करार वाढवण्याच्या प्रस्तावाला नापसंती दर्शवली आहे.

    विराट कोेहलीने कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला असून टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. विराटनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता अधिकपटीने वर्तवली जात आहे. रोहितकडे टीम इंडियाची धुरा सांभाळण्यास दिली तर जवळपास 78.94 टक्के टीम विजयी ठरू शकते. असं सांगितलं जात आहे.

    आयपीएलमध्ये 5  वेळा ट्रॉफी जिंकल्या

    2013 मध्ये, मुंबई इंडियन्सने स्पर्धेच्या मध्यात मोठी खेळी केली आहे, रिकी पाँटिंगकडून कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले. त्यानंतर मुंबईची ही पैज संघासाठी उपयुक्त ठरली आणि फ्रँचायझी प्रथमच ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाली. त्यानंतर रोहितने मागे वळून पाहिले नाही. रोहितने आयपीएलमध्ये 5 वेळा ट्रॉफी जिंकल्या आहेत. तर विराट कोहलीचं आयपीएलमधील कर्णधारपदाचं आणि संघाचं नेतृत्व पाहिलं असता आरसीबी टीमला एकही ट्रॉफी मिळवता आलेली नाहीये.

    2017 मध्ये रोहित शर्माला प्रथमच टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यावेळी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आणि रोहितला संघाची कमान मिळाली. भारताने ही वनडे मालिका 2-1 ने जिंकली होती.