चौथ्या सामन्यातील टी-२० मालिकेत टीम इंडियाचा दणदणीत विजय, रोहित शर्माची कॅप्टनसी, ‘करो वा मरो’ स्थितीमध्ये इंग्लंडचा उडवला धुव्वा

गुरुवारी झालेल्या चौथ्या मॅचमध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा ८ रननं पराभव केला. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगतदार झालेली ही मॅच भारताने जिंकली आणि मालिकेत बरोबरी साधली.

    अहमदाबाद: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील टी-२० मालिकेत टीम इंडियानं (Team India) पुनरागमन केलं आहे. गुरुवारी झालेल्या चौथ्या मॅचमध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा ८ रननं पराभव केला. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगतदार झालेली ही मॅच भारताने जिंकली आणि मालिकेत बरोबरी साधली.

    सूर्यकुमार यादवचं अर्धशतक हे भारताच्या बॅटींगचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं. सूर्यकुमारनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच बॅटींग करताना २८ बॉलमध्येच अर्धशतक झळकावले. रोहित, राहुल आणि विराट हे प्रमुख बॅट्समन मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले.

    रोहित शर्माची कॅप्टनसी

    गुरुवारच्या मॅचच्या शेवटच्या टप्प्यात रोहित शर्मानं कॅप्टनसी केली. नियमित कॅप्टन मैदानात नसल्याचा कोणताही परिणाम भारताच्या फिल्डिंगवर झाला नाही. त्याने बॉलर्स उत्तम हातळले. शेवटच्या ओव्हरमध्ये दबावात असलेल्या शार्दुल ठाकूरला मार्गदर्शन केले. भारताच्या विजयात रोहितच्या शांत कॅप्टनसीचे मोठे योगदान होते.