टेनिस स्टार सानिया मिर्झा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

टोकिओ ऑलंपिक खेळांचे आयोजन २३जुलै पासून होणार आहे. सहावेळा ग्रॅंडस्लॅम विजेती ३४ वर्षीय सानिया ऑलंपिकमध्ये अंकिता रैनासोबत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. सानियाची ही ४ थी ऑलंपिक असणार आहे

  नवी दिल्ली: टोकिओ ऑलम्पिक अवघे काही दिवस उरले आहेत. ऑलम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यास भारतीय खेळाडू सज्ज झाले आहे. अशातच
  भारताची टेनिस स्टार खेळाडू सानिया मिर्झाने ऑलम्पिक आपला खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

  इंस्टाग्रामवर पोस्ट केल्या गेलेल्या या व्हिडिओ पोस्टला कॅप्शन देत सानियाने म्हटले की, माझ्या नावातील A चा अर्थ माझ्या आयुष्यात बरंच काही आहे. म्हणजेच अग्रेशन, ऍंबिशन, अचीव, अफेक्शन असे म्हणत ती अमेरिकी रॅपर डोजा कॅटच्या ‘किस मी मोर’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओला जगभरातील चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत करत पसंती दिली आहे.

  टोकिओ ऑलंपिक खेळांचे आयोजन २३जुलै पासून होणार आहे. सहावेळा ग्रॅंडस्लॅम विजेती ३४ वर्षीय सानिया ऑलंपिकमध्ये अंकिता रैनासोबत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. सानियाची ही ४ थी ऑलंपिक असणार आहे.