
टीम इंडिया आपल्या संघातून २ फिरकीपटू आणि ३ वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवू शकतात. यामध्ये फिरकीपटू अश्निव आणि अक्षर पटेल धडाकेबाज गोलंदाजीसाठी तयारीत राहू शकतात. तर वेगवान गोलंदाजीमध्ये इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या या तिघांपैकी एकाची निवड आणि संघात वापसी होऊ शकते.
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात उद्या (बुधवार) चौथ्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. जगभरातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. परंतु या मैदानाविषयी अजूनही रहस्य गुलदस्त्यातच आहे. पहिले २ ते ३ दिवस पेसर्सला मोठी मदत मिळू शकते. परंतु फिरकीपटू सुद्धा आपले चांगले प्रदर्शन दाखवू शकतात. टीम इंडिया आपल्या संघातून २ फिरकीपटू आणि ३ वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवू शकतात. यामध्ये फिरकीपटू अश्निव आणि अक्षर पटेल धडाकेबाज गोलंदाजीसाठी तयारीत राहू शकतात. तर वेगवान गोलंदाजीमध्ये इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या या तिघांपैकी एकाची निवड आणि संघात वापसी होऊ शकते.
नेटमध्ये पिंक चेंडूने पंड्याने केला सराव
बुमराहने या सीरीजची पहिली कसोटी खेळली आहे. दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराजला त्याच्या जागेवर खेळवण्यात आलं होतं. तिसऱ्या कसोटी सामन्यात सिराजच्या जागेवर बुमराह संघात कमबॅक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु दुखापत झाल्यामुळे बाहेर असलेला ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने नेटमध्ये पिंक चेंडूने सराव केला होता. त्यामुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये बुमराहच्या बदल्यात हार्दिक पांड्याला संघात घेण्याची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवली जात आहे.
पांड्याला संघात घेतल्यानंतर ३ ऑलराऊंडर पर्याय उपलब्ध होतील
जर हार्दिक पांड्याने संघात कमबॅक केलं तर प्लेईंग इलेव्हनमध्ये आश्विन आणि अक्षर या फिरकीपटू समवेत एकूण ३ ऑलराऊंडर खेळाडू एकत्र येतील. कसोटीच्या दुसऱ्या सामन्यात आश्विनने शतक झळकावत १०६ धावा पूर्ण केल्या होत्या. तसेच पहिल्या व दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने १७ विकेट्स घेतल्या आहेत.
हिटमॅन रोहित शर्मा तिसरा फिरकीपटू होण्याची शक्यता?
एका कसोटी सामन्यात अक्षर पटेलने एकूण ७ विकेट्स घेतले आहेत. टॉप-५ विकेट्स टेकरमधून त्याचा भारतातून दुसरा क्रमांक लागतो. जर टीम इंडिया २ फिरकीपटू समवेत मैदानात उतरली, तर रोहित शर्मा हा चेंडूच्या फिरकीसाठी तिसरा पर्यायी खेळाडू ठरू शकतो. आतापर्यंत रोहितने ३६ कसोटी सामन्यांत २ विकेट्स, २४ एकदिवसीय मालिकेत ८ विकेट्स, आणि १०८ टी-२० सामन्यांत १ विकेट घेतली आहे.