फायनल खेळणं ही तर आमची भूक..,इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी विराटने सांगितलं असं काही…

विराट म्हणाला, WTC फायनलचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कसोटी खेळणं हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आम्ही गेल्या 5-6 वर्षात ज्याप्रकारे संघबांधणी केली आहे, त्याचच फळ म्हणजे आम्ही फायनलमध्ये दाखल झालो आहे. फायनलमध्ये खेळण्याची भूक आणि इच्छा होती.

    मुंबई : तीन महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मीडियाशी संवाद साधला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला पोहोचणे हे 4 ते 6 वर्षांच्या मेहनतीचं फळ आहे, असं कर्णधार विराट कोहली म्हणाला. तर कसोटी फायनल ही एक ऐवजी तीन सामन्यांची हवी होती, असं रवी शास्त्री म्हणाले.

    विराट म्हणाला, WTC फायनलचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कसोटी खेळणं हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आम्ही गेल्या 5-6 वर्षात ज्याप्रकारे संघबांधणी केली आहे, त्याचच फळ म्हणजे आम्ही फायनलमध्ये दाखल झालो आहे. फायनलमध्ये खेळण्याची भूक आणि इच्छा होती.

    इंग्लंडमध्ये टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची (ICC World Test Championship Final) अर्थात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळणार आहे. सी