आयपीएलच्या नवीन संघाचा ‘या’ तारखेला होणार लिलाव ; संघ खरेदीसाठी आहेत ‘या’ अटी

आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने ३१ ऑगस्ट २०२१ रोजी दोन नवीन संघांच्या लिलावासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती.  ज्यांना आयपीएलच्या संघांसाठी लिलावासाठी संघ घ्यायचे आहेत त्यांना ५ ऑक्टोबरपर्यंत आपली नावे देण्याची मुभा ठेवण्यात आली आहे.

  येत्या काही दिवसातच आयपीएल2021 च्या(IPL 2021) उर्वरित हंगामास सुरुवात होत आहे. या हंगामात आयपीएलमध्ये आठ ऐवजी दहा संघ खेळणार आहेत. त्यासाठी नवीन दोन संघाच्या लिलावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. येत्या १७ ऑक्टोबरला लिलाव होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या १५ व्या हंगामात दहा संघ भिडणार आहेत.

  आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने(IPL Governing Council) ३१ ऑगस्ट २०२१ रोजी दोन नवीन संघांच्या लिलावासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती.  ज्यांना आयपीएलच्या संघांसाठी लिलावासाठी संघ घ्यायचे आहेत त्यांना ५ ऑक्टोबरपर्यंत आपली नावे देण्याची मुभा ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्यांच्या मनात या प्रक्रियेबाबत कोणतीही शंका असेल त्यांना प्रश्न विचारण्यासाठी २३ सप्टेंबर ही अखेरची तारीख ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ५ ऑक्टोबरपर्यंत बीसीसीआयकडे(BCCI) जी लोक आपली नावे देतील त्यांनाचा या लिलावात सहभागी होता येणार आहे.

  संघाच्या खरेदीसाठी करावी लागणारही प्रक्रिया
  – आयपीएलच्या नवीन संघाच्या खरेदीसाठी भरावी लागणार १० लाख रुपयांची अनामत रक्कम
  – ५ ऑक्टोबरपर्यंत सर्व कागदपत्रे बीसीसीआयकडे पाठवणे बंधनकारक असेल
  – ज्या कंपनीचा टर्नओव्हर ३ हजार कोटी रुपये एवढा आहे, त्यांना या लिलावात सहभागी होता येणार
  – प्रत्येक संघाची किंमत यावेळी किमान २ हजार कोटी रुपये एवढी

  आयपीएलमधील संघाच्या संख्येत वाढ होणार असल्याने वेळापत्रकाचा ढाचा बदलावा लागणार आहे. प्रत्येक संघाला १४ किंवा १८ साखळी सामने खेळावे लागतील. प्रत्येक फ्रेंचायझीला घरच्या मैदानावर ७ सामने आणि दूरच्या ठिकाणी ७ सामने खेळावे लागतात. सध्या प्रत्येक संघाला प्रत्येकी ७ सामने खेळायला मिळतात. मात्र संघांच्या वाढीमुळे जर प्रत्येक संघाला १८ सामने खेळायचे असतील तर स्पर्धेची वेळ वाढेल. संघांना २ गटांमध्ये विभागले जाईल. आयपीएलच्या पुढील हंगामात ७४ सामन्यांची स्पर्धा होण्याची शक्यता आहे.