बांगलादेशच्या खेळाडूला संताप अनावर झाला अन् आपल्याच संघातील खेळाडूवर धावून गेला.., पहा पुढे काय झालं?

बांगलादेशचा यष्टीरक्षक आणि फलंदाज मुश्फिकर रहीम या त्याच्या खेळासाठी ओळखला जातो. यावेळी आपल्याच संघातील एका खेळाडूवर रहीमचा संताप इतका अनावर झाला, की तो थेट त्याच्या अंगावरच धावून गेला. पण, त्याचं हे संतप्त रुप क्रीडा रसिकांना मात्र काहीसं खटकलं. नेटकऱ्यांनी त्याची खिल्लीही उडवली आहे.

क्रिकेटच्या सामन्यात ( cricket match) अनेक प्रकारचे प्रसंग घडत असतात. काही खेळाडू एखाद्याची विकेट पडल्यानंतर भर मैदानात डान्स करतात. तर काही खेळाडू ऐकमेकांची खिल्ली उडवतात. दोन संघांमध्ये सुद्धा खेळाडूंची भांडणं होत असतात. परंतु आपल्याच संघातील खेळाडूच्या अंगावर धावून जाणं म्हणजे सख्खा मित्र पक्का वैरी… बांगलादेशच्या ( Bangladeshi player ) एका खेळाडूला संताप अनावर झाला अन् तो भर मैदानातच आपल्या संघातील खेळाडूवर धावून गेल्यामुळे नेटकऱ्यांकडून टीकेची झडीमार होत आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

बांगलादेशच्या दोन खेळाडूंमध्ये नक्की काय झालं ?

बांगलादेशचा यष्टीरक्षक आणि फलंदाज मुश्फिकर रहीम या त्याच्या खेळासाठी ओळखला जातो. यावेळी आपल्याच संघातील एका खेळाडूवर रहीमचा संताप इतका अनावर झाला, की तो थेट त्याच्या अंगावरच धावून गेला. पण, त्याचं हे संतप्त रुप क्रीडा रसिकांना मात्र काहीसं खटकलं. नेटकऱ्यांनी त्याची खिल्लीही उडवली आहे. दोन खेळाडू आणि एक झेल, असं काहीसं चित्र उभं राहिलेलं असतानाच रहिमनं अखेर हा झेल टीपला. पण त्यानंतर लगेचच मोठ्या आवेगात संतप्त रहीमनं नसुमवर हात उगारला. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये ही बाब अगदी स्पष्टपणे दिसत आहे.


दरम्यान, फलंदाज मुश्फिकर रहीम अनेक वादांमुळंही चर्चेचा भाग ठरला आहे. आता पुन्हा एकदा हा खेळाडू वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या सुरु असणाऱ्या Bangabandhu T20 Cup मध्ये आपल्या वर्तणुकीसाठी आता तो वादात अडकू शकतो.