IPL रद्द केल्यानंतर भारतातल्या T20 वर्ल्ड कपवरही येणार मोठं संकट, ‘या’ देशात होणार स्पर्धा

सप्टेंबर महिन्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे बीसीसीआय टी-20 वर्ल्ड कप युएईमध्ये हलवू शकतं. स्पर्धा युएईमध्ये (UAE) खेळवली गेली, तरी वर्ल्ड कपचं आयोजन मात्र बीसीसीआयच करेल. आयसीसीने सुरुवातीलाच कोरोना संकटात भारतात टी-20 वर्ल्ड कप खेळवण्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.

    भारतामध्ये कोरोना व्हायरसने (Corona Virus) थैमान घातलं असतानाही बीसीसीआयने (BCCI) आयपीएलचं (IPL 2021) आयोजन केलं. बायो-बबलमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येत असतानाही वेगवेगळ्या टीम्समध्ये कोरोनाने शिरकाव केला, अखेर बीसीसीआयला आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. आयपीएल स्थगित झाल्यानंतर आता भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपबाबतही (T20 World Cup) प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.

    सप्टेंबर महिन्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे बीसीसीआय टी-20 वर्ल्ड कप युएईमध्ये हलवू शकतं. स्पर्धा युएईमध्ये (UAE) खेळवली गेली, तरी वर्ल्ड कपचं आयोजन मात्र बीसीसीआयच करेल. आयसीसीने सुरुवातीलाच कोरोना संकटात भारतात टी-20 वर्ल्ड कप खेळवण्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.

    भारत मागच्या ७० वर्षातल्या सगळ्यात खराब आरोग्य संकटातून जात आहे, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जागतिक स्पर्धेचं आयोजन करणं सुरक्षित नाही’, असं बीसीसीआयच्या सूत्राने सांगितलं.