रिषभ पंत आणि धोनीच्या तुलनेचं स्वरुप एकच ; सौरव गांगुलीचं आश्चर्यकारक विधान

पंत आणि धोनीच्या तुलनेचं स्वरुप काहीही असलं तरी पंत आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं प्रतिस्पर्धी संघाकडून कोणताही सामना खेचून आणण्याची ताकद ठेवणारा खेळाडू आहे, असं विधान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केलं आहे.

    टीम इंडियाचा यष्टीरक्षक रिषभ पंतची तुलना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याशी केली आहे. पंतनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्यावेळी धोनी देखील टीम इंडियाकडून खेळत होता. वनडे आणि टी-२० मध्ये पंतला यश प्राप्त झालं नसलं तर कसोटी क्रिकेटमध्ये पंतनं शानदार कामगिरी केली आहे.

    पंत आणि धोनीच्या तुलनेचं स्वरुप काहीही असलं तरी पंत आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं प्रतिस्पर्धी संघाकडून कोणताही सामना खेचून आणण्याची ताकद ठेवणारा खेळाडू आहे, असं विधान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केलं आहे.

    रिषभ पंत हा जवळपास धोनीसारखाच खेळाडू आहे. तो सामना जिंकवणारा खेळाडू आहे. तो विरोधी संघाच्या हातात असलेला सामना केव्हाही खेचून आणू शकतो. तो अविश्वसनीय फटके लगावतो. पंत आपल्या संघाला सामना जिंकविण्याची जिद्द ठेवतो. मग तो कसोटी सामना असो, एकदिवसीय असो किंवा मग टी-२०. तो काही मिनिटांत सामन्याचं रुप पालटू शकतो, असा कौतुकाचा वर्षाव सौरव गांगुली यांनी रिषभ पंतवर केला आहे.