वर कोरोनाचे सावट ; एका खेळाडू सह पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

ऑलिम्पिकमधील जपानच्या एका खेळाडूंसह पाच ऑलिम्पिक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती टोकियो २०२० च्या आयोजकांनी दिली आहे.

    टोकियो ऑलिम्पिकला(Tokyo Olympics) केवळ एका आठवड्याचा कालावधी शिल्लक असताना ऑलिम्पिकपुढील आव्हाने संपता संपेनात अशी स्थिती झालेली पाहायला मिळत आहे. आधीच कोरोनाच्या सावटामुळे एक वर्षपुढे ढकलेल्या टोकियो ऑलिम्पिक कोरोनाचे सावट अद्याप कायम असल्याचे दिसून आले आहे. ऑलिम्पिकमधील जपानच्या एका खेळाडूंसह पाच ऑलिम्पिक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती टोकियो २०२० च्या आयोजकांनी दिली आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे १ जुलैपासून जपानमध्ये दाखल झालेल्या ८ हजार जणांपैकी केवळ काहींनाच कोरोनाची बाधा झाली आहे.

    याबरोबरच बुधवारी टोकियोतील हामामात्सू सिटीमधील एका हॉटेलमध्ये ३१ जणांचा समावेश असलेले ब्राझीलचे पथक वास्तव्यास आहे. तेथील हॉटेलच्या आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. हॉटेलात बायो-बबलमध्ये असून त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तसेच रशिया रग्बी संघाच्या एका सपोर्ट स्टाफ सदस्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.