घरगुती क्रिकेट स्पर्धा आयपीएल संपेपर्यंत स्थगित करणार ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर BCCI चा मोठा निर्णय

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा २०२०-२१ जागतिक महासाथीच्या पार्श्वभूमीवर उशिरानं सुरू झाल्या. महासाथीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला देशांतर्गत स्पर्धा सुरू करण्यासाठी जानेवारी २०२१ पर्यंतची वाट पाहावी लागली, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

    कोरोनाबाधितांच्या संख्येत काही दिवसांपासून मोठी वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर BCCI नं मोठा निर्णय घेतला आहे. BCCI नं सर्वच वयोगटातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये विनू मंकड ट्रॉफीचाही समावेश आहे. BCCI चे सचिव जय शाह यांनी सर्व राज्यांच्या संघटनांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली असून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्याच्या निर्णयाचीही माहिती दिली.

    देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा २०२०-२१ जागतिक महासाथीच्या पार्श्वभूमीवर उशिरानं सुरू झाल्या. महासाथीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला देशांतर्गत स्पर्धा सुरू करण्यासाठी जानेवारी २०२१ पर्यंतची वाट पाहावी लागली, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

    मुंबई आणि उत्तर प्रदेश या संघांमधील सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडिअममध्ये १४ मार्चला आयोजित करण्यात आला होता. महिला संघाच्या सीनिअर टीमचे एकदिवसीय सामने निरनिराळ्या ठिकाणी आयोजित करण्याचीही योजना आहे आणि याचा अंतिम सामना ४ एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे.

    या हंगामात सर्वच वयोगटातील स्पर्धा अधिकाधिक करण्याचा आमचा प्रयत्न होता. सध्या या क्रिकेट स्पर्धा खेळवण्यासाठी काही राज्यांमधील परिस्थिती अनुकूल नाही. तसंच येत्या काळात देशात दहावी आणि बारावीच्या परीक्षाही पार पडणार आहे.