वेम्ब्ले मैदानात प्रथमच प्रेक्षकांशिवाय ‘एफ ए’ चषकाची लढत होणार

कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात वाढत आहे. त्यामुळे त्याचा फटका अनेक क्रिडा क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे इंग्लंड फुटब़ॉल संघाचे मुख्य मैदान असणाऱ्या वेम्ब्ले येथे प्रथमच एफ ए चषकाची उपांत्य आणि

कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात वाढत आहे. त्यामुळे त्याचा फटका अनेक क्रिडा क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे इंग्लंड फुटब़ॉल संघाचे मुख्य मैदान असणाऱ्या वेम्ब्ले येथे प्रथमच एफ ए चषकाची उपांत्य आणि अंतिम फेरी प्रेक्षकांशिवाय मैदानात खेळवणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ४२ कर्मचाऱ्यांची भरती याआधीच करोनामुळे थांबण्यात आली होती आणि आता त्यात कर्मचारी कपातीची भर करण्यात आली आहे. वेम्ब्लेवर युरो चषकातील सात लढती होणार होत्या. परंतु आता ही स्पर्धाही थेट पुढील वर्षी होणार आहे.

इंग्लंड फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष ग्रेग क्लार्क यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनामुळे आमचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पुढील काही वर्षे हे आर्थिक संकट कायम असेल. तसेच फुटबॉल स्पर्धेच्या अनेक स्पर्धा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे जवळपास ३७ कोटी डॉलर्सचा फटका इंग्लंड फुटबॉल संघटनेला बसल्याचं समजलं जात आहे.