भारत आणि न्यूझीलंडच्या संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आजपासून सुरु, साऊथॅम्प्टनमध्ये पाऊस ; पहिलं सेशनही रद्द

 साऊथॅम्प्टनमध्ये (Southampton) आजपासून सुरु होणाऱ्या या ऐतिहासिक अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या (Virat kohli) ‘आक्रमकते’चा सामना केन विल्यमसन (Kane Williamson) ‘कूल’ अंदाज करेल. संपूर्ण जगाच्या नजरा या दोन्ही तुल्यबळ कर्णधारांकडे लागल्या आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक ३ वाजता या सामन्याला सुरुवात होणार होईल.

    भारत आणि न्यूझीलंडच्या संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (World Test Championship Final) आजपासून सुरु होणार असला तरी या सामन्यावर पावसाचे सावट आहे.  साऊदम्पटनमधील हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात हा सामना खेळवला जाणार असला तरी साऊदम्पटनमध्ये रात्रभर पाऊस पडत आहे. पावसाच्या या धुव्वाधार बॅटिंगमुळे पहिल्या दिवसाचा खेळ वेळेत सुरु होण्यासंदर्भात शंका उपस्थित केली जात आहे.

    साऊथॅम्प्टनमध्ये (Southampton) आजपासून सुरु होणाऱ्या या ऐतिहासिक अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या (Virat kohli) ‘आक्रमकते’चा सामना केन विल्यमसन (Kane Williamson) ‘कूल’ अंदाज करेल. संपूर्ण जगाच्या नजरा या दोन्ही तुल्यबळ कर्णधारांकडे लागल्या आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक ३ वाजता या सामन्याला सुरुवात होणार होईल.

    इंग्लंडमधील स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता सामना सुरु होणार आहे. न्यूझीलंडमधील स्थानिक वेळेनुसार रात्री साडेनऊला पाहता येणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीनला सामन्यातील प्रत्यक्ष खेळ सुरु होणार आहे. मात्र आता पावसामुळे आणि आऊट फिल्डवर पासवाचे पाणी असल्याने सामना निश्चित कधी सुरु होईल हे पूर्णपणे पावसावर अवलंबून असणार आहे.