भारत-श्रीलंकेदरम्यान पहिला एकदिवसीय सामना, सामना कुठं आणि कधी होणार?

या सामन्यात विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन भारताकडून डेब्यू करू शकतो. वास्तविक, सॅमसनने भारताकडून टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मात्र, अद्याप त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही. या सामन्यात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला कर्णधार शिखर धवन आणि पृथ्वी शॉ सलामीला येऊ शकतात.

  भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेचा पहिला सामना आज रविवार, 18 जुलै रोजी खेळला जाणार आहे. हा सामना कोलंबोमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल. नव्या दमाच्या टीम इंडियासमोर श्रीलंकेचं तगडं आव्हान असणार आहे.

  पहिल्यांदाच नॅशनल कोचची भूमिका पार पाडणाऱ्या राहुल द्रविड आणि नेतृत्व करणाऱ्या शिखर धवनची ही कसोटी असणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 3 तीन वाजता सुरु होईल.

  या सामन्यात विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन भारताकडून डेब्यू करू शकतो. वास्तविक, सॅमसनने भारताकडून टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मात्र, अद्याप त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही. या सामन्यात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला कर्णधार शिखर धवन आणि पृथ्वी शॉ सलामीला येऊ शकतात.

  देवदत्त पडिकल, ऋतुराज गायकवाड आणि नितीश राणा यांच्या रूपात टीम इंडियाकडे इतर पर्याय असले तरी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार धवन पृथ्वी शॉला सलामीची पहिली संधी देऊ शकतात.

  भारत संभाव्य प्लेईंग  इलेव्हन – शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मनीष पांडे, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि नवदीप सैनी

  श्रीलंका संभाव्य  प्लेईंग  इलेव्हन – पथुम निसंका, चरिथ असालंका, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदु हसरंगा, रमेश मेंडिस, धनंजय डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, प्रवीण जयविक्रमा.