टीम इंडिया विरूद्ध इंग्लंडमध्ये आज पहिला टी-२० सामना, कधी आणि कुठे होणार?

या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) करण्यात आलं आहे. टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी विराट कोहलीच्या खांद्यावर असणार आहे. तर इंग्लंडची जबाबदारी इयॉन मॉर्गनच्या खांद्यावर असेल.

    अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात आज (शुक्रवार) ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळण्यात येणार आहे. कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया इंग्लंडचा चितपट करण्यासाठी सज्ज आहे. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) करण्यात आलं आहे. टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी विराट कोहलीच्या खांद्यावर असणार आहे. तर इंग्लंडची जबाबदारी इयॉन मॉर्गनच्या खांद्यावर असेल.
    या सामन्याला संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

    अशी असेल संघातील टीम

    टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

    इंग्लंड टीम : इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.