अनुष्काच्या प्रकरणावर ‘या’ माजी क्रिकेटपटूने नाव न घेता केलं सूचक ट्विट, म्हणाला…

 मुंबई : आयपीएलच्या १३ व्या हंगामातील (IPL 2020) किंग्ज ईलेव्हन पंजाबविरूद्ध आरसीबी (KXIP VS RCB) या दोन संघामध्ये झालेल्या सामन्यात अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विरोट कोहली (VIRAT KOHLI) ट्रोल झाला आहे. त्याच्या कमगिरीवर अनेकांनी टीका केली आहे. तसेच काल शुक्रवारी माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर (SUNIL GAVASKAR) यांनी सुद्धा कोहलीवर टीका करताना त्याची पत्नी अनुष्का शर्माचाही (ANUSHKA SHARMA) त्यांनी उल्लेख केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर एकच गदारोळ सुरू झाला आहे.

सुनील गावसकर यांच्यानंतर आता भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण ( IRFAN PATHAN) याने सुनील गावसकर यांना पाठिंबा दिला आहे. परंतु कोणाचेही नाव न घेता इरफानने अनुष्कावर निशाणा साधला आहे. या प्रकरणानंतर आता इरफान पठाणने एक सूचक ट्विट केले आहे. तो म्हणाला की, सुनील गावसकर सरांचा नेहमीच आदर करा, नेहमीच. मात्र, इरफानने यावेळी कोणाचेही नाव घेतले नाही. परंतु त्याच्या या ट्विटचा रोख अनुष्कावर होता. हे स्पष्टपणे दिसत आहे.

 काय म्हणाले सुनील गावसकर ?

विराटची सुमार कामगिरी बघून गावसकर यांनी “ल़ॉकडाऊन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग कि प्रॅक्टिस की इन्होंने” असं म्हटलं. गावसकर यांनी उपरोधिकपणे टीका केल्याने अनुष्का शर्मा नाराज झाली असून तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांच्या विधानावर अनुष्का शर्मानं भली मोठी पोस्ट लिहिली.

अनुष्का शर्माची भली मोठी पोस्ट

पतीच्या कामगिरीसाठी पत्नीला जबाबदार का धरलं असावं? असा प्रश्न उपस्थित करताना अनुष्काने म्हटलं आहे की, गेली अनेक वर्ष एखाद्या क्रिकेटपटूच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना तुम्ही त्याच्या खाजगी आयुष्याचा आदर केला असेलच, याची मला खात्री आहे. मग, तुम्हाला असं वाटत नाही का आम्हालाही तसाच समान आदर मिळायला हवा? माझ्या पतीच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना तुमच्या डोक्यात शब्दांचा भंडार नक्कीच होता किंवा तुमचं ते विधान माझ्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हतं का?

हे वर्ष २०२० असून माझ्यासाठी काहीच बदललेलं नाही. माझं नाव क्रिकेटमध्ये ओढणं कधी थांबेल आणि अशा कमेंट कधी थांबतील? अशी खंत अनुष्काने व्यक्त केली आहे. शेवटी तिने लिहिलं आहे की, आदरणीय मिस्टर गावसकर, तुम्ही एक महान खेळाडू असून जेंटलमनच्या या खेळात तुमचं नाव नेहमी उंचावर असेल. पण तुम्ही काय बोललात हे कळल्यानंतर मला काय वाटतं ते सांगण्याची इच्छा होती. असे अनुष्का म्हणाली.