टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात, पुजारा-विराट जोडी मैदानात

चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली असून टीम इंडियाची सलामीवीर जोडी चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली मैदानात उतरली आहे. त्यामुळे आज टीम इंडिया काय कामगिरी करणार? हे पाहणं क्रिकेट प्रेमींसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

    टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये पहिल्या डावात टीम इंडियाने ७८ धावांपर्यंतच मजल मारली होती. परंतु इंग्लंडने उत्कृष्ट फलंदाजी करत टीम इंडियाशी आगेकूच केली आणि पहिल्या डावात ४३२ धावांचा डोंगर उभा केला.

    टीम इंडियाने तिसऱ्या दिवसअखेर ८० षटकात २ गड्यांच्या बदल्यात २१५ धावांपर्यंत मजल मारली आहे. चेतेश्वर पुजारा ९१ तर कर्णधार विराट कोहली ४५ धावांवर नाबाद खेळत आहेत. आता चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली असून टीम इंडियाची सलामीवीर जोडी चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली मैदानात उतरली आहे. त्यामुळे आज टीम इंडिया काय कामगिरी करणार? हे पाहणं क्रिकेट प्रेमींसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.