टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात, इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय

या दोेन्ही संघामध्ये आजचा सामना केनिंग्टनच्या ओव्हल मैदानावर रंगणार आहे. तसेच दोन्ही संघाकडून आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियाचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन पुन्हा एकदा संघामध्ये जागा मिळवण्यात अपयशी ठरला आहे. तर दुसरीकडे इंग्लंडने सॅम करनऐवजी वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सला संघामध्ये प्रवेश दिला आहे.

    टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच सामन्यांची मालिका सध्या १-१ ने बरोबरी साधली आहे. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा दारूण पराभव केला. त्यानंतर इंग्लंडने सामन्यात टीम इंडियाशी १-१ अशी आघाडी मिळवली.

    या दोेन्ही संघामध्ये आजचा सामना केनिंग्टनच्या ओव्हल मैदानावर रंगणार आहे. तसेच दोन्ही संघाकडून आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियाचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन पुन्हा एकदा संघामध्ये जागा मिळवण्यात अपयशी ठरला आहे. तर दुसरीकडे इंग्लंडने सॅम करनऐवजी वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सला संघामध्ये प्रवेश दिला आहे.

    टीम इंडियाला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी

    टीम इंडियाचा रेकॉर्ड ओव्हलमध्ये चांगला राहिलेला नाहीये. १३ पैकी फक्त १कसोटी जिंकता आली आहे. ५० वर्षांपूर्वी टीम इंडियाला या मैदानावर शेवटचा विजय मिळाला होता. त्यामुळे भारताला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी आहे. या सामन्यात सर्वाधिक दबाव कर्णधार विराट कोहलीवर असणार आहे. तसेच चौैथा कसोेटी सामना टीम इंडियासाठी जिंकणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

    असे असतील दोन्ही संघ

    टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

    इंग्लंड : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, हसीब हमीद,जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), डेव्हिड मलान, ओली पोप, मोईन अली, ख्रिस वोक्स, क्रेग ओव्हर्टन, ओली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन.