लेक माझी लाडकी ! भारतीय संघातील ‘या’ खेळाडूच्या प्रेयसीने वडिलांना केलं यकृत दान, कोण आहे ही महिला ?

आपल्या वडिलांना यकृत दान करणारी मुलगी ही भारतीय क्रिकेट संघातील युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीची प्रेयसी आहे. पूजा बिजारनिया असं नवदीपच्या प्रेयसीचं नाव आहे. पूजाने आपल्या वडिलांचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चे ५५ टक्के यकृत वडिलांना दान केलं.

    मुंबई : आपल्याकडे घरात प्रत्येकाला मुलगा हवा असतो आणि मुलगी म्हटलं की नको वाटायचं. आताच्या काळात हे अशी माणसिकता काही प्रमाणात कमी झाली आहे. अशातच एका लेकीने आपल्या वडिलांना यकृत दान केलं आहे.

    आपल्या वडिलांना यकृत दान करणारी मुलगी ही भारतीय क्रिकेट संघातील युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीची प्रेयसी आहे. पूजा बिजारनिया असं नवदीपच्या प्रेयसीचं नाव आहे. पूजाने आपल्या वडिलांचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चे ५५ टक्के यकृत वडिलांना दान केलं.

    या उपचारासाठी पूजा आणि तिच्या कुटुंबीयांना स्वत:ची संपत्ती विकावी लागली. पूजाचं लिव्हर तिच्या वडिलांना ट्रान्स्प्लांट करणारे डॉ. रचित श्रीवास्तव यांनी मीडियाला ही माहिती दिली. पूजाच्या या कृतीची सोशल माध्यमांवर चांगलीच चर्चा आहे तर अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे.