भारत-पाकिस्तानची टीम पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात भिडणार, ICC ची मोठी घोषणा ; कधी आणि कुठे होणार सामना ?

आयसीसीने (ICC) दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांचं स्थान पक्कं झालं आहे, त्यामुळे कॉमनवेल्थ गेम्समध्ये चाहत्यांना भारत-पाकिस्तान सामना बघायला मिळू शकतो.

    भारत आणि पाकिस्तानची (India vs Pakistan) टीम पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात एकमेकांना भिडणार आहेत. आयसीसीने बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) च्या क्वालिफायिंग टीमची घोषणा केली आहे. या कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला टी-20 मॅच खेळवल्या जाणार आहेत.

    आयसीसीने (ICC) दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांचं स्थान पक्कं झालं आहे, त्यामुळे कॉमनवेल्थ गेम्समध्ये चाहत्यांना भारत-पाकिस्तान सामना बघायला मिळू शकतो.

    बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्सना पुढच्यावर्षी 28 जुलै ते 8 ऑगस्टमध्ये खेळवले जातील. इतिहासात दुसऱ्यांदाच क्रिकेट कॉमनवेल्थ गेम्सचा भाग असेल, याआधी 1998 साली क्वालालंपूर ऑलिम्पिक्समध्ये पुरुष क्रिकेट टीम यामध्ये खेळली होती, तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला होता.