पॅरालिम्पिकमध्ये भारताचे ‘हे’ खेळाडू करणार दमदार कामगिरी ; जाणून घ्या सामन्याचे वेळापत्रक

आपल्या अपंगत्वावर मात करत जगभरातील खेळाडूंना एकत्र आणणारे व्यासपीठ म्हणून पॅरालिम्पिककडे पाहिले जाते  पॅरालिम्पिकमधील विविध २२ क्रीडा प्रकारात भारतातील एकूण ५४ पॅराअथलिटस सहभागी होत आहेत.

  टोकियो येथे आजपासून  सुरू झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत (Tokyo Paralympics 2020) दमदार कामगिरी करण्यासाठी भारतीय पॅरा एथलिट्स सज्ज झाले आहेत. पॅरालिम्पिकमधील विविध २२ क्रीडा प्रकारात भारतातील एकूण ५४ पॅराअथलिटस सहभागी होत आहेत. आपल्या अपंगत्वावर मात करत जगभरातील खेळाडूंना एकत्र आणणारे व्यासपीठ म्हणून पॅरालिम्पिककडे पाहिले जाते.

  ‘या’ खेळांचा पॅरालिम्पिक स्पर्धेत समावेश

  तिरंदाजी, अथलेटिक्स, बॅडमिंटन, बोसिआ, सायकलिंग (रोड आणि ट्रॅक), घोडेस्वारी, फुटबॉल फाईव्ह अ साईड, गोलबॉल, ज्युडो, पॅराकनोई, पॅराट्रायलथॉन, पॉवरलिफ्टिंग, नौकानयन, नेमबाजी, सीटिंग व्हॉलीबॉल, जलतरण, टेबल टेनिस, तायक्वांडो, व्हीलचेअर बास्केटबॉल, व्हीलचेअर तलवारबाजी, व्हीलचेअर रग्बी, व्हीलचेअर टेनिस.

  भारतीय खेळाडू उद्या (२५ ऑगस्ट) पासून ,अ‍ॅथलेटिक्स, टेबल टेनिस, तिरंदाजी, पॉवरलिफ्टिंग, स्विमिंग,पुरुष भालाफेक ,नेमबाजी या क्रीडा प्रकारात आपली कामगिरी करणार आहेत.

  सामन्याचे वेळापत्रक

  २५ ऑगस्ट – टेबल टेनिस
  पहिला सामना-  सोनलबेन मुधभाई पटेल
  दुसरा सामना– भाविना हसमुखभाई पटेल

  २७ ऑगस्ट – तिरंदाजी
  पुरुष गट– हरविंदर सिंह, विवेक चिकारा
  पुरुष गट– राकेश कुमार, श्याम सुंदर स्वामी
  महिला गट– ज्योती बालियान
  महिला गट – ज्योति बालियान आणि टीबीसी

  पॉवरलिफ्टिंग
  पुरुष- ६५किलो गट– जयदीप देसवाल
  महिला- ५० किलो गट– सकीना खातून

  स्विमिंग -सुयश जाधव

  २८ ऑगस्ट – अ‍ॅथलेटिक्स

  पुरुष भालाफेक– रंजीत भाटी

  २९ ऑगस्ट – अ‍ॅथलेटिक्स
  पुरुष थाली फेक– विनोद कुमार
   पुरुष उंच उडी – निशाद कुमार, राम पाल

  ३० ऑगस्ट – अ‍ॅथलेटिक्स
  पुरुष थाली फेक – योगेश कथुनिया
  पुरुष भालाफेक – सुंदर सिंह गुर्जर, अजीत सिंह, देवेंद्र झाजरिया
  पुरुष भालाफेक – सुमित अंटिल, संदीप चौधरी

  नेमबाजी
  पुरुष १० मीटर एयर रायफल – स्वरूप महावीर उन्हालकर, दीपक सैनी
  महिला १० मीटर एयर रायफल – अवनी लेखारा

  ३१ ऑगस्ट – नेमबाजी
   पुरुष १० मीटर एयर पिस्टल – मनीष नरवाल, दीपेंदर सिंह, सिंहराज
   महिला १० मीटर एयर पिस्टल – रुबिना फ्रांसिस

  अ‍ॅथलेटिक्स
  पुरुष उंच उडी – शरद कुमार, मारियप्पन थंगावेलू, वरूण भाटी
  महिला १०० मीटर – सिमरन
  महिला शॉटपुट – भाग्यश्री माधवराव जाधव

  १ सप्टेंबर – बॅडमिंटन
  पुरुष एकेरी – प्रमोद भगत, मनोज सरकार
  महिला एकेरी– पलक कोहली
  मिश्र दुहेरी – प्रमोद भगत आणि पलक कोहली

  अ‍ॅथलेटिक्स
  पुरुष क्लब थ्रो – धर्मबीर नैन, अमित कुमार सरोहा

  २ सप्टेंबर – बॅडमिंटन
  पुरुष एकेरी – सुहास लालिनाकेरे यातिराज, तरुण ढिल्लन
  पुरुष एकेरी– कृष्णा नागर
  महिला एकेरी – पारुल परमार
  महिला मिश्र – पारुल परमार आणि पलक कोहली

  पॅरा कॅनॉइंग
  महिला गट– प्राची यादव

  तायक्वांडो
  महिला गट – ४९ किलो- अरुणा तंवर

  नेमबाजी
   मिक्स्ड – २५ मीटर पिस्टल – आकाश आणि राहूल जाखड

  3 सप्टेंबर – नेमबाजी
   पुरुष – ५० मीटर रायफल – दीपक सैनी
   महिला – ५० मीटर रायफल – अवनी लेखारा

  स्विमिंग-
  ३५० मीटर बटरफ्लाई– सुयश जाधव, निरंजन मुकुंदन

  अ‍ॅथलेटिक्स
   पुरुष उंच उडी – प्रवीण कुमार
   पुरुष भालाफेक – टेक चंद
  पुरुष शॉटपुट – सोमन राणा
  महिला क्लब थ्रो – एकता भ्यान, कशिश लाकडा

  ४ सप्टेंबर – नेमबाजी
   मिक्स्ड राउंड – १० मीटर एयर रायफल – दीपक सैनी, सिद्धार्थ बाबू आणि अवनी लेखारा
  मिक्स्ड राउंड – ५० मीटर पिस्टल – आकाश, मनीष नरवाल आणि सिंहराज

  अ‍ॅथलेटिक्स
  पुरुष भालाफेक – नवदीप सिंह

  ५ सप्टेंबर – नेमबाजी
   मिक्स्ड राउंड – ५० मीटर रायफल-दीपक सैनी, अवनि लेखारा आणि सिद्धार्थ बाबू