भारतीय क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्याला पुढील महिन्यापासून सुरूवात होणार

बीसीसीआयचे CEO हेमांग आमीन यांनी त्यासाठी दोन पर्याय डोळ्यासमोर ठेऊन वेळापत्रक तयार केले आहेत. सप्टेंबरमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी यूएई व लंडन या दोन पर्यायांचा विचार सुरू आहे आणि 29 मे रोजी होणाऱ्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय येणे अपेक्षित आहे.

    भारतीय क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्याला पुढील महिन्यापासून सुरूवात होईल. 2 जूनला भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे आणि त्यानंतर क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणार आहे. 18 ते 23 जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळवली जाईल.

    त्यानंतर एका महिन्याच्या ब्रेकनंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत मैदानावर उतरणार आहे. पण, या मालिकेनंतर बीसीसीआय आयपीएल 2021च्या दुसऱ्या टप्प्याच्या आयोजनाचा विचार करत आहे.