महेंद्रसिंग धोनीचा ‘त्रिफळा’ उडाला ; चेन्नईवर पंजाब भारी पडला

पंजाब किंग्सला प्ले ऑफचं गणित सोडवणं अवघड असलं तरी अखेरच्या सामन्यात विजय मिळवण्याचा त्यांचा निर्धार प्रकर्षानं जाणवला. ऋतुराज गायकवाड ( १२) चुकीचा फटका मारून अर्षदीप सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर मोईन अली (०), सुरेश रैना ( २) व अंबाती रायुडू ( ४) हे झटपट माघारी परतले.

    आयपीएलच्या (IPL 2021) प्ले ऑफमधील स्थान पक्के झाले असले तरी चेन्नई सुपर किंग्सचा संघ ( Chennai Super Kings) आज पंजाब किंग्सचं ( Punjab Kings) आव्हान परतवून लावण्यासाठी मैदानावर उतरला. पण, त्यांच्यावर पंजाबच भारी पडला आहे. CSKचा फॅफ ड्यू प्लेसिस एकटा काय तो खेळला. सहाव्या विकेटसाठी त्याला रवींद्र जडेजाची साथ मिळाली.

    पंजाब किंग्सला प्ले ऑफचं गणित सोडवणं अवघड असलं तरी अखेरच्या सामन्यात विजय मिळवण्याचा त्यांचा निर्धार प्रकर्षानं जाणवला. ऋतुराज गायकवाड ( १२) चुकीचा फटका मारून अर्षदीप सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर मोईन अली (०), सुरेश रैना ( २) व अंबाती रायुडू ( ४) हे झटपट माघारी परतले. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आजतरी खेळेल असे वाटले होते, परंतु रवी बिश्नोईनं ( Ravi Bishnoi) त्याला पुन्हा त्रिफळाचीत केले.