आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात लढत

आयपीएलच्या १३ व्या (IPL 2020) हंगामातील २१ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Kolkata Knight Riders Vs  Chennai Super Kings) यांच्यात रंगणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळानुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल.

आयपीएलच्या १३ व्या (IPL 2020) हंगामातील २१ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Kolkata Knight Riders Vs  Chennai Super Kings) यांच्यात रंगणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळानुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल. या हंगामात आतापर्यंत कोलकाताने ४ पैकी २ सामने जिंकले (Win) आहेत आणि २ गमावले (Lost) आहेत. दुसरीकडे चेन्नईने ५ पैकी केवळ २ सामने जिंकले आहेत.

गुणतालिकेत सध्या केकेआर (KKR) चौथ्या स्थानावर आहे तर सीएसके (CSK) पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना हा सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करायचे आहे. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक आणि अष्टपैलू आंद्रे रसल हे संघातील अत्यंत महत्त्वाचे खेळाडू आहेत. या हंगामातील सलामीचा सामना जिंकल्यानंतर चेन्नईने सलग तीन सामने गमावले. त्यानंतर ५ व्या सामन्यात चेन्नईने पंजाबला १० गडी राखून पराभूत केले.

सलामीवीर डु प्लेसिस आणि शेन वॉटसन यांनी जबरदस्त नाबाद अर्धशतकी खेळी खेळली. अशा परिस्थितीत विजयी मार्गावर परतलेला चेन्नई संघ आजचा सामना जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.