मुंबई इंडियन्सची जबरदस्त फटकेबाजी, रोहित शर्मासह डिकॉकचा फॉर्म जोरात

पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला(MI Lost The Match)  धोनीच्या चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबईला या मॅचमध्ये कर्णधार कायरन पोलार्ड विजय मिळवून देऊ शकला नाही.

    आयपीएलच्या (IPL 2021) दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला(MI Lost The Match)  धोनीच्या चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबईला या मॅचमध्ये कर्णधार कायरन पोलार्ड विजय मिळवून देऊ शकला नाही. आता आज कोलकात्याविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजयाची चव चाखण्यासाठी मुंबई इंडियन्स आतुर झालेला आहे.

    नाणेफेक जिंकत कोलकाता नाईट रायडर्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. मुंबई इंडियन्सची जबरदस्त फटकेबाजी सुरू असून हिटमॅन रोहित शर्मासह डिकॉकची बॅट कणखररित्या चालू आहे.