हैदराबादला पहिला झटका, सलामीवीर अभिषेक शर्मा आऊट

हैदराबादचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा बाद झाला आहे. 13 धावा होताच जियॉर्ज गार्टनच्या चेंडूवर मॅक्सवेलने त्याचा झेल घेतला आहे. तसेच अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर जेसन रॉय आणि कर्णधार केन विल्यमसनने उत्तम भागिदारी करत संघाचा डाव सांभाळला.

    आज रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद (RCB Vs SRH) या संघामध्ये अबुधाबीच्या शेख जायद मैदानावर पार पडत आहे. आरसीबी याआधीच प्लेऑफमध्ये (Play Off) गेली असून हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे. त्यामुळे सामना प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा नसला. तरी आरसीबी आज विजयी झाल्यास त्यांचा हा आयपीएलमधील 100 वा विजय असेल.

    हैदराबादचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा बाद झाला आहे. 13 धावा होताच जियॉर्ज गार्टनच्या चेंडूवर मॅक्सवेलने त्याचा झेल घेतला आहे. तसेच अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर जेसन रॉय आणि कर्णधार केन विल्यमसनने उत्तम भागिदारी करत संघाचा डाव सांभाळला. दोघांनी अर्धशतकी भागिदारी पूर्ण केली असून 11 ओव्हरनंतर हैद्राबादचा 81 वर 1 बाद असा आहे.