आज कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये रंगणार सामना

सलामीच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज (CSK)  यांच्यात पहिला सामना झाला होता. परंतु चेन्नईच्या उत्कृष्ट खेळीमुळे मुंबई इंडियन्सचा पराभव (Lost) झाला. मात्र, आज मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना  आणि कोलकत्ता नाईट रायडर्सचा पहिला सामना आहे.

आयपीएलच्या १३ व्या (IPl 2020) हंगामातील चार सामने पूर्ण झाले आहेत. आज बुधवारी (Wednesday) पाचवा सामना कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स  (KKR Vs MI ) या दोन संघांमध्ये रंगणार आहे. सलामीच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज (CSK)  यांच्यात पहिला सामना झाला होता. परंतु चेन्नईच्या उत्कृष्ट खेळीमुळे मुंबई इंडियन्सचा पराभव (Lost) झाला. मात्र, आज मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना  आणि कोलकत्ता नाईट रायडर्सचा पहिला सामना आहे.

आयपीएल २०२० जिंकण्यासाठी केकेआर संघाने काही खास बदल आपल्या संघात केले आहेत. धडाकेबाज खेळाडू आंद्रे रसेलला (Andre Russell)  पहिल्या फळीत खेळवण्याचा विचार केकेआर करत असल्याचे संकेत संघाच्या वतीने देण्यात आले आहेत. कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याआधी रसेल आपल्यासाठी सर्वात मोठं आव्हान असल्याचं सांगितलं आहे.

रसेल इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधित स्ट्राइक रेटसोबत फलंदाजी करणारा खेळाडू आहे. रसेलने आतापर्यंत ६४ आयपीएल मॅचेस खेळल्या आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात संध्याकाळी ठीक ७.३० वाजता आबुधाबी मैदानावर सामना होणार असून कोणता संघ यावेळी बाजी मारणार, याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं आहे.