चळवळ सोशल मीडियावर होतेय व्हायरल; ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ॲन सॅनच्या समर्थनात तरुणी देतायत लढा

ॲनच्या समर्थनार्थ पुढे येताना आजवर हजारो तरुणींनी आपले केस कापले आहेत आणि बिफोर (मोठ्या केसांचा)- आफ्टर ( केस कापलेला) असे दोन्ही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

    टोकियो ऑलिम्पिकमध्ये साऊथ कोरियाची खेळाडू ॲन सॅनने ( Ann San)तिरंदाजी क्रीडाप्रकारात सुवर्णपदक पटकावले. खेळात तिने केलेल्या कामगिरीनंतर सोशल मीडियातून तिचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले. या फोटोमध्ये फोटोंमध्ये तिने आपले केस कापलेले, पुरुषांसारखे छोटे केलेले दिसत होते.अन मग काय हे निमित्त झालं अन तिच्या देशातील लोकांनी तिचे कौतुक करण्या ऐवजी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. या टीकेत तिच्या संस्कृती भ्रष्ट केल्याचा आरोप करण्यात आला. टीकाकांमध्ये पुरुष , युवक आघाडीवर असले तरी वयोवृद्ध स्त्रियांनी टीका करण्याची संधी सोडली नाही. स्त्रीवादी (फेमिनिस्ट) सारखी लेबल लावत तिला धारेवर धरलं.
    दुसरीकडे ॲनवरची टीका जसजशी वाढत जातेय तशी तिच्या बाजूने दक्षिण कोरियातील अनेक तरुणी उभ्या राहिल्या आहेत. रूढीवादी , परंपरावादी पुरुषी मानसिकतेचा निषेध करत टीकारांना चांगलंच फटकारले आहे तर ॲनच्या समर्थनार्थ पुढे येताना आजवर हजारो तरुणींनी आपले केस कापले आहेत आणि बिफोर (मोठ्या केसांचा)- आफ्टर ( केस कापलेला)(#womenshorthaircut) असे दोन्ही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. असं करणाऱ्या तरुणींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. केस कापल्यामुळे आमच्या स्त्रीत्वात कोणतीही कमतरता येत नाही असेही त्यांनी पुरुषांना सुनावले आहे.

    परंतु ही वेळ मुलींमुळेच आमच्यावर आल्याचे तिथलया तरुणांनी म्हटले आहे. पुरुषांच्या नोकऱ्यांवर, हक्कांवर तुम्ही कब्जा केल्याने युवक बेरोजगार आहे. तिथे तरुणांना किमान दोन वर्षे सक्तीने सेनादलात सेवा द्यावी लागते. तरुणांचे म्हणणे आहे, हे तर फारच अन्यायकारक आहे. कारण या काळात विविध नोकऱ्यांतील तरुणांच्या जागा तरुणी पटकावतात. त्यामुळे तरुणांना बेकार राहावं लागतं. शिवाय सेनेत दाखल झाल्यावर काही दुखापत वगैरे झाली, त्यांचे करिअर संपुष्टात येत असल्याची टीकाही पुरुष करत आहेत.