बायो बबलचे नियम धाब्यावर बसवून न्यूझीलंडचे खेळाडू गेले गोल्फ खेळण्यासाठी; भारत करणार आयसीसीकडे तक्रार

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक आहेत. कोरोना काळात ही लढत होत असल्याने खेळाडूंना बायो बबलमध्ये ठेवले जात आहे. साउथॅम्पटनमधील एका हॉटेलमध्ये दोन्ही संघाचे खेळाडू वास्तव्यास आहेत. पण न्यूझीलंडच्या सदस्यांनी अंतिम सामन्यापूर्वी बायो-बबलचे नियम मोडल्याप्रकरणी बीसीसीआय आयसीसीकडे तक्रार दाखल करणार आहे. बायो बबलचे नियम धाब्यावर बसवून न्यूझीलंडचे काही खेळाडू सकाळी गोल्फ खेळण्यासाठी गेले होते. यामुळे भारतीय संघ प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे, अशी बातमी क्रिक बजने दिली आहे.

    साउदम्प्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक आहेत. कोरोना काळात ही लढत होत असल्याने खेळाडूंना बायो बबलमध्ये ठेवले जात आहे. साउथॅम्पटनमधील एका हॉटेलमध्ये दोन्ही संघाचे खेळाडू वास्तव्यास आहेत. पण न्यूझीलंडच्या सदस्यांनी अंतिम सामन्यापूर्वी बायो-बबलचे नियम मोडल्याप्रकरणी बीसीसीआय आयसीसीकडे तक्रार दाखल करणार आहे. बायो बबलचे नियम धाब्यावर बसवून न्यूझीलंडचे काही खेळाडू सकाळी गोल्फ खेळण्यासाठी गेले होते. यामुळे भारतीय संघ प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे, अशी बातमी क्रिक बजने दिली आहे.

    न्यूझीलंड संघातील खेळाडू ट्रेंट बोल्ट, टीम साउदी, हेन्नरी निकोल्स, मिशेल सँटनर, डेरिल मिशेल आणि संघाचे फिजिओ टॉमी सिमसेक सकाळी गोल्फ खेळण्यास गेले. न्यूझीलंडचे खेळाडू बायो बबलच्या बाहेर पडल्याने भारतीय संघ व्यवस्थापन काळजीत पडले आहे. यासंदर्भात न्यूझीलंड संघाच्या व्यवस्थापनाला वाटते की, त्यांच्या खेळाडूंनी बायो बबल प्रोटोकॉल तोडलेला नाही. करण हॉटेल आणि गोल्फ कोर्स एकाच परिसरात आहे.

    जे खेळाडू गोल्फ खेळण्यास गेले होते त्यापैकी सँटनर आणि डेरियल यांचा समावेश फायनल सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या 15 खेळाडूंमध्ये केला गेला नाही. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आयसीसीने दोन्ही संघांना समान पाहण्याची गरज आहे. ही गोष्टी आयसीसीच्या समोर ठेवली जाणार आहे.

    हे सुद्धा वाचा