सलग पाचव्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा एकमेव क्रिकेटर , फोर्ब्स यादीत पहिल्या १०० खेळाडूमध्ये पटकावलं स्थान

विराट आयपीएल मध्ये बंगलोर चँलेंजर्सचा कप्तान आहे. १२ महिन्यात त्याने कमावलेल्या २२९ कोटी पैकी २५ कोटी त्याला वेतन म्हणून मिळाले आहेत तर बाकी २०४ कोटींची कमाई त्याने जाहिरातीतून केली आहे. 

    टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली याने सलग पाचव्या वर्षी एक वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळविले आहे. फोर्ब्सच्या या यादीतील पहिल्या १०० खेळाडूमध्ये विराट एकमेव क्रिकेटर असून तो ३१.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे २२९ कोटी रुपये कमावून ५९ व्या स्थानावर आला आहे.

    विराट आयपीएलमध्ये बंगलोर चँलेंजर्सचा कप्तान आहे. १२ महिन्यात त्याने कमावलेल्या २२९ कोटी पैकी २५ कोटी त्याला वेतन म्हणून मिळाले आहेत तर बाकी २०४ कोटींची कमाई त्याने जाहिरातीतून केली आहे.

    या यादीत १ नंबरवर मिक्स्ड मार्शल आर्ट खेळाडू कॉर्नर मेकग्रेगर असून त्याची कमाई आहे १५१७ कोटी. त्याखालोखाल फुटबॉल खेळाडू लियोनेल मेस्सी यांचा नंबर असून त्याची कमाई ९१९ कोटी तर फुटबॉलपटू रोनाल्डोची कमाई ८७५ कोटी असून तो तीन नंबरवर आहे.