आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन दुबईत, सप्टेंबर महिन्यामध्ये होणार सुरुवात

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयपीएल सामने रद्द करण्यात आले होते. स्थगित झालेले सामने दुबई येथे घेण्यात येणार आहे. 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या 25 दिवसांच्या कालावधीत 31 सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

    आयपीएलचा 14वा सीझन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आयपीएल रद्द झाल्यामुळे नाराज झालेले चाहत्यांना आयपीएलचं आयोजन पुन्हा कधी, केव्हा आणि कुठे करण्यात येणार याबाबत उत्सुकताही आहे. अशातच आयपीएलच्या आयोजनाबाबत मोठी बातमी हाती आली आहे.

    एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांचं आयोजन 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत दुबई येथे करण्यात येणार आहे.