उद्यापासून पॅरालिम्पिक स्पर्धेला सुरुवात; भारतातून ‘इतके’ खेळाडू होणार सहभागी

२४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर असे १३ दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात २२ खेळांचा समावेश असून १३६ देशांचे ३६८६ खेळाडू पदकांसाठी कौशल्य पणाला लावणार आहेत.

    जपानमधील टोकियो येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर उद्यापासून (मंगळवार) पॅरालिम्पिक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर असे १३ दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात २२ खेळांचा समावेश असून १३६ देशांचे ३६८६ खेळाडू पदकांसाठी कौशल्य पणाला लावणार आहेत. टोकियोतील २१ मैदानांवर ही स्पर्धा पार पडणार आहे.

    टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत ६ खेळाडूंकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. यामध्ये देवेंद्र झाझरिया (भालाफेक), मरियप्पन थंगावेलू (उंच उडी), सुहास एल. यतिराज (बॅडमिंटन), एकता भयान (थाळीफेक), प्रमोद भगत (बॅडमिंटन) व मनीष नरवाल (नेमबाजी) या खेळाडूंचा समावेश आहे. देवेंद्र झाझरियाने २००४ व २०१६च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. यावेळी देशवासीयांना त्याच्याकडून तिसऱ्या सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.