IND Vs AUS 2020 (Live) : | कांगारुला दुसरा धक्का, स्टिव्ह स्मिथला माघारी धाडलं | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट8 महीने पहले

कांगारुला दुसरा धक्का, स्टिव्ह स्मिथला माघारी धाडलं

ऑटो अपडेट
द्वारा- Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
14:51 PMDec 02, 2020

कांगारुला दुसरा धक्का, स्टिव्ह स्मिथला माघारी धाडलं

- भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला माघारी धाडलं आहे.  टी नटराजनने कांगारूला पहिला धक्का दिल्यानंतर शार्दुलने दुसरा दणका दिला आहे. त्यामुळे स्मिथ ७ धावा काढून बाद झाला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ही ११७ झाली असून २ विकेट्स गमावले आहेत.

- ऑस्ट्रेलियाच्या २३ ओव्हर पूर्ण झाल्या असून ११८ धावसंख्या झाली आहे.

- ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचचं अर्धशतक

14:30 PMDec 02, 2020

कांगारुला दिला पहिला धक्का, मार्नस लाबुशेन त्रिफळाचीत होऊन माघारी

- ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, टी. नटराजनने घेतला पहिला बळी

- मार्नस लाबुशेन त्रिफळाचीत होऊन माघारी

13:25 PMDec 02, 2020

हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजाची शानदार खेळी

- ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३०३ धावांचं आव्हान

- भारताने ओलांडला त्रिशतकी धावसंख्येचा टप्पा

- हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजाची शानदार फटकेबाजी

- हार्दिक पांड्या ९२ धावा करून नाबाद तर जाडेजा ६६ धावा करून नाबाद

 

11:55 AMDec 02, 2020

३५ ओव्हरमध्ये १६४ धावा

भारताने ३५ ओव्हरमध्ये १६४ धावा बनवल्या असून ५ गडी गडी बाद झाले आहेत. हार्दिक पंड्याने १९ धावा पूर्ण केल्या असून रवींद्र जडेजाच्या ३ धावा पूर्ण झाल्या आहेत.

11:28 AMDec 02, 2020

भारताच्या ३२ ओव्हरमध्ये १५३ धावा पूर्ण

ऑस्ट्रेलियाचं भारतावर कांगारू पॅटर्न, कर्णधार विराट कोहलीची उडवली दांडी

भारताच्या ३२ ओव्हरमध्ये १५३ धावा पूर्ण झाल्या असून ५ गडी बाद झाले आहेत. कर्णधार विराट कोहलीने उत्कृष्ट कामगिरी केली असता, त्याच्या (६१) धावा पूर्ण झाल्या आहेत. परंतु आता विराटही माघारी परतला आहे. तर हार्दिक पांड्या मैदानात उतरला असून हार्दिकच्या (९) धावा पूर्ण झाल्या आहेत.

11:06 AMDec 02, 2020

भारताला पुन्हा एकदा चौथा धक्का

- विराट कोहलीचं अर्धशतक पूर्ण

- भारताची निराशाजनक कामगिरी, के.एल.राहुलला अपयश

- भारताला पुन्हा एकदा चौथा धक्का बसला असून राहुलच्या ११ चेंडूत ५ धावा झाल्या आहेत.

- भारताच्या २३ ओव्हरमध्ये ११४ धावा पूर्ण झाल्या असून कर्णधार विराट कोहली (४०) आणि श्रेयस अय्यरने (१९)  धावा बनवून विकेट गमावल्यानंतर के.एल.राहुलचं मैदानात आगमन झालं आहे.

- भारताने ११४ धावा पूर्ण केल्या असून तीन गडी बाद झाले आहेत. त्यामुळे भारतासाठी ही धक्कादायक बाब ठरू शकते.

10:48 AMDec 02, 2020

भारताने शंभरी गाठली

-  भारताला तिसरा धक्का, श्रेयस अय्यर माघारी परतला . भारताचे तीन गडी बाद झाले असून  ऑस्ट्रेलियाचं पुन्हा एकदा दमदार पुनरागमन झालेलं दिसत आहे.

- विराट कोहली अर्धशतकेच्या टप्प्यात

- भारताने शतकी धावसंख्येचा टप्पा केला असून २२ ओव्हरमध्ये १११ धावा पूर्ण केल्या आहेत.

- कर्णधार विराट कोहली (३८)  आणि श्रेयस अय्यर (१८) च्या धाव संख्येवर मैदानात

10:32 AMDec 02, 2020

भारताच्या १७ ओव्हरमध्ये ८७ धावा, तर २ विकेट

- विराट कोहली आणि शुभमन गिलची जमलेली जोडी फुटली. विराट कोहलीच्या (३२) धावा, तर शुभमन गिल (३३) धावा करून माघारी परतला. त्यामुळे ८२ धावांवर भारताला दुसरा धक्का बसला आहे.

- एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीचा अनोखा विक्रम

10:09 AMDec 02, 2020

भारताच्या ११ ओव्हरमध्ये ५९ धावा, तर १ विकेट

- भारताच्या ११ ओव्हरमध्ये ५९ धावा, तर १ विकेट

- विराट कोहली (१४) तर शुभमन गिल (२५) धावांवर खेळत आहेत.

- भारताच्या ५ ओव्हरमध्ये २४ धावा 

भारताने ७ ओव्हरमध्ये ३५ धावा बनवल्या असून शुभमन गिलच्या (१५) धावा झाल्या आहेत. तर शिखर धवननंतर सलामीला भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला आहे.


 

 

09:44 AMDec 02, 2020

टीम इंडियाचा फलंदाज शिखर धवन माघारी

- भारताला पहिला धक्का, शिखर धवनची दांडी गुल

- टीम इंडियाचा वेगवान फलंदाज शिखर धवन  आणि शुभमन गिल यांची पहिली जोडी मैदानात

-  ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सांभाळून सामना केल्यानंतर दोन्ही फलंदाजांकडून सुरेख फटके

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia ) यांच्यात आज तिसरा वनडे (ODI) सामना रंगणार आहे. यामध्ये भारताच्या दोन सामन्यांचा पराभव झाला असून ऑस्ट्रेलिया संघाने २-० अशी आघाडी मिळवली आहे. आज शेवटचा सामना कॅनबेरा (Canberra) येथे सुरू आहे. तिसऱ्या वनडेमध्ये कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या दौऱ्यात विराटने पहिल्यांदाच टॉस (Win the Toss) जिंकला आहे. याआधी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने (Finch) टॉस जिंकला होता.

या सामन्यात मयंक अग्रवालऐवजी शुभमन गिल, युझवेंद्र चहलऐवजी कुलदीप यादव, मोहम्मद शमीऐवजी टी नटराजन आणि नवदीप सैनीऐवजी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. तर ऑस्ट्रेलियानेही टीममध्ये तीन बदल केले आहेत. कॅमरुन ग्रीन, सीन ऍबॉट आणि एश्टन एगर यांना संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा ६६ धावांनी तर दुसऱ्या वनडेमध्ये ५१ धावांनी पराभव झाला होता. त्यामुळे आज टीम इंडिया अखेरच्या वनडे सामन्यात भारताची प्रतिष्ठा राखणार का ? हे पाहणं क्रिकेट प्रेमींसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

भारतीय टीम

शिखर धवन, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, टी नटराजन

ऑस्ट्रेलियाची टीम

एरॉन फिंच, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॉइसेस हेनरिक्स, ऍलेक्स कारे, कॅमरुन ग्रीन, एश्टन एगर, सीन ऍबॉट, एडम झम्पा, जॉस हेजलवूड

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
०५ गुरुवार
गुरुवार, ऑगस्ट ०५, २०२१

नितीश कुमारांनी पेगॅससच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारलाच घरचा आहेर दिल्याने भाजपा याचा वचपा काढण्यात यशस्वी होईल, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.