कोरोनाचा धोका दिवसेंदिवस होतोय गडद

जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती येत्या २३ जुलैपासून स्पर्धा सुरू होणार असल्याचे सांगत असले तरीही करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

    टोकियो:  टोकियो ऑलिम्पिकला अवघे काही दिवस उरले असताना दुसरीकडे ऑलिम्पिकवरील कोर्टोनाचे सावत गडद होत चालले आहे. यजमानपद असलेल्या खेळाडूला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त समोर आले असतानाचा रशिया व ब्राझील संघातही कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आले आहे. येत्या २३ जुलै ऑलिम्पिकला सुरु होणार असून ते ८ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. मात्र वाढत्या कोरोनाच्या रुग्णासंख्येमुळे आयोजकांना धक्का बसत असतानाच विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

    यापूर्वीही जपानच्या एका ऑलिम्पिकपटूसह ५ ऑलिम्पिक कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. आता रशिया आणि ब्राझीलच्या संघातही करोनाने एन्ट्री केल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनाच्या वाढत्या धोक्‍यामुळेच गेल्या वर्षी होत असलेली ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली होती.

    जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती येत्या २३ जुलैपासून स्पर्धा सुरू होणार असल्याचे सांगत असले तरीही करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.