स्पर्धेत 2 नवे संघ येणार, मेगा ऑक्शन होणार

बीसीसीआय डिसेंबरमध्ये आयपीएल मेगा ऑक्शन करू शकते. म्हणजेच खेळाडूंचा नव्याने लिलाव करण्यात येणार आहे. सर्व संघ 4 खेळाडू संघात कायम ठेऊ शकतील. पण यासाठी अट ठेवण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये एक परदेशी किंवा दोन देशांतर्गत व दोन परदेशी खेळाडू असणे आवश्यक आहे.एका आयपीएल संघात जास्तीत जास्त २५ खेळाडू ठेवता येतात. आता दोन संघांचा समावेश होत असल्यामुळे नविन 50 खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल. दरम्यान, आयपीएल चौदावा हंगाम ४ मे रोजी तहकूब करण्यात आला. 60 पैकी 29 सामने झाले आहेत. उर्वरित 31 सामने यूएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहेत.

  दिल्ली : बीसीसीआय आयपीएलच्या पुढील हंगामात दोन नविन संघाचा समावेश करणार आहे. ऑगस्टपर्यंत या संघाच्या निविदा बीसीसीआय मागवू शकते. आतापर्यंत आठ संघ आयपीएलमध्ये खेळत होते. नविन दोन संघाचा समावेश वाढल्याने सामने वाढतील. यामुळे स्पर्धेतील रोमांच आणखी वाढणार आहे. हे दोन संघ खरेदी करण्यासाठी गोएंका ग्रुप आणि अदानी ग्रुप शर्यतीत आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ फ्रेंचायझी यात पुढे आहेत. दोन नवीन संघांच्या समावेशानंतर सामन्यांची संख्याही 15 ते 30 ने वाढणार आहे.

  फक्त 4 खेळाडूच ठेवता येणार कायम

  मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय डिसेंबरमध्ये आयपीएल मेगा ऑक्शन करू शकते. म्हणजेच खेळाडूंचा नव्याने लिलाव करण्यात येणार आहे. सर्व संघ 4 खेळाडू संघात कायम ठेऊ शकतील. पण यासाठी अट ठेवण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये एक परदेशी किंवा दोन देशांतर्गत व दोन परदेशी खेळाडू असणे आवश्यक आहे.एका आयपीएल संघात जास्तीत जास्त २५ खेळाडू ठेवता येतात. आता दोन संघांचा समावेश होत असल्यामुळे नविन 50 खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल. दरम्यान, आयपीएल चौदावा हंगाम ४ मे रोजी तहकूब करण्यात आला. 60 पैकी 29 सामने झाले आहेत. उर्वरित 31 सामने यूएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहेत.

  सीएसके ‘या’ खेळाडूंना करू शकते रिटेन

  मेगा ऑक्शनमुळे सर्वात जास्त चर्चा रंगली आहे की, प्रत्येक संघ कोणत्या चार खेळाडूंना रिटेन करणार. यात महेंद्रसिंह धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्ज आघाडीवर आहे. या संघात रिटेन करायचे म्हटल्यास, सर्वात आधी नाव येते महेंद्रसिंह धोनीचे. चेन्नई धोनीला सोडू इच्छित नाही. दुसरा खेळाडू सुरेश रैना किंवा रविंद्र जडेजा ठरू शकतो. तसे तर दोन्ही खेळाडू चेन्नईसाठी महत्वपूर्ण आहेत. पण या दोघांना रिटेन करण्याची शक्यता थोडी कमी आहे. जर धोनीला रिलिज करण्यात आले तर या दोघांना रिटेन करण्याचा विचार चेन्नईकडून होऊ शकतो. गोलंदाजीत दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांच्यात कडवी टक्कर आहे. कारण दोन्ही खेळाडू गोलंदाजीसह फलंदाजीत देखील योगदान देऊ शकतात. विदेशी खेळाडूंमध्ये सॅम कुरेनला रिटेन करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. कारण फॅफ डू प्लेसिसचे वय आणि फॉर्म पाहता चेन्नई फॅफला संघात कायम ठेवेल, याची शक्यता कमी आहे. या यादीत इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीचे नाव देखील आहे. परंतु, चेन्नई कोणत्या चार खेळाडूंना रिटेन करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  ऋषभ पंतचे कर्णधारपद जाणार?

  दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर आयपीएल 2021 चा उर्वरित हंगाम खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. परंतु, श्रेयसच्या अनुपस्थितीत यंदा ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषवले होते. त्यामुळे श्रेयसचे पुनरागमन झाल्यावर कोण दिल्लीचे नेतृत्व करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, कर्णधारपदाचा निर्णय माझ्या हातात नसल्याचे श्रेयसने सांगितले. खांद्याला झालेल्या दुखापतीतून मी सावरलो आहे. आता अखेरचा टप्पा बाकी असून त्याला महिन्याभराचा कालावधी लागेल. परंतु, मी सरावाला सुरुवात केली आहे. मी आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामात खेळणार आहे, असे श्रेयस म्हणाला. आयपीएल 2021च्या आधी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली होती. यामुळे तो काही महिने क्रिकेटपासून दूर होता.