टीम इंडिया आणि श्रीलंकामध्ये होणार वनडे आणि टी-२० मालिकेचा थरार, राहुल द्रविड टीमसह सज्ज

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये ३ वनडे सामने खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये १३ जुलै, १६ जुलै आणि १८ जुलै रोजी हे सामने खेळवले जाणार आहेत. तर २१ जुलै, २३ जुलै आणि २५ जुलै रोजी टी-२० मालिका खेळली जाणार आहे. तसेच हे सर्व सामने कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहेत. 

  टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर पोहोचली असून वनडे आणि टी-२० मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या सामन्याला दोन्ही संघामध्ये १३ जुलैला होणार सुरूवात होणार आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आपल्या संघासह मैदानात सज्ज झाले आहेत. तर संपूर्ण टीमची जबाबदारी ही टीमचा धुव्वाधार खेळाडू आणि फलंदाज शिखर धवनच्या हाती देण्यात आली आहे. धवन टीमचा कर्णधार असणार आहे. १९ सदस्यीय टीमच्या कर्णधार समवेत ६ खेळाडू श्रीलंकाच्या विरूद्ध वनडे मालिकेसाठी खेळणार आहेत.

  या खेळाडूंमध्ये २ फलंदाज शिखर धवन आणि मनीष पांडे यांच्या व्यतिरिक्त एक ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सुद्धा असणार आहे. राहुल द्रविड आणि धवनच्या धावा पाहिल्या असता धवन असा खेळाडू आहे, ज्याने लंकेच्या विरूद्ध १०० पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत.

  राहुल द्रविड आणि धवनच्या एकूण धावा आणि शतक – 

  राहुल द्रविड (कोच)

  ४६ वनडे
  १६६२ धावा
  ०३ शतक

  शिखर धवन (कर्णधार)
  १६ वनडे
  ९८३ धावा
  ०४ शतक

  टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये ३ वनडे सामने खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये १३ जुलै, १६ जुलै आणि १८ जुलै रोजी हे सामने खेळवले जाणार आहेत. तर २१ जुलै, २३ जुलै आणि २५ जुलै रोजी टी-२० मालिका खेळली जाणार आहे. तसेच हे सर्व सामने कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहेत.

  कशी असेल टीम इंडिया – 

   शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, नितीश राणा, ईशान किशन, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया