आजपासून अमेरिकन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेस सुरुवात

यंदाच्या स्पर्धेतील सर्बियाचा नोवाक जोकोवीच तर ऑस्ट्रेलियाच्या ऍश्‍ले बार्टी हिला महिला एकेरीत विजेतेपदाची प्रमुख दावेदार मानले जात आहे.

    न्युयॉर्क: आजपासून अमेरिकन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेस(US Open Grand Slam tennis tournament)  सुरुवात होत आहे. जागतिक टेनिसमधील स्टार खेळाडू राफेल नदाल व रॉजर फेडरर (Rafael Nadal and Roger Federer)यांच्या अनुपस्थितीत ही स्पर्धा रंगणार आहे. यंदाच्या स्पर्धेतील सर्बियाचा नोवाक जोकोवीच तर ऑस्ट्रेलियाच्या ऍश्‍ले बार्टी हिला महिला एकेरीत विजेतेपदाची प्रमुख दावेदार मानले जात आहे.

    यंदा टोकियोत झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्डन ग्रॅंडस्लॅम पूर्ण करण्यात जोकोवीच अपयशी ठरला होता. त्याला या स्पर्धेत ऍलेक्‍झांडर ज्वेरेवने पराभूत करत सुवर्णपदक जिंकले होते. त्याला या स्पर्धेत चौथे मानांकन आहे. महिलांमध्ये आर्यना सबालेंकाला दुसरे, तर जपानची गतविजेती नाओमी ओसाकाला तिसरे मानांकन देण्यात आले. जागतिक क्रमवारीनुसार यंदा मानांकने देण्यात आले आहे.

    हे सामने पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना कोरोनाच्या नियमानुसारच परवानगी देण्यात येणार आहे. प्रेक्षकांना सामान बघण्यासाठी येत असताना करोनाची लस घेतल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. लस घेतलेल्या प्रेक्षकांनाच स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.