अखेर प्रतिक्षा संपली! आयपीएल २०२०चे वेळापत्रक जाहीर

स्पर्धेतील पहिला सामना चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेतेपद ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचं रनसंग्राम होणार आहे.

आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक आज रविवारी जाहीर करण्यात आलं आहे. आयपीएल २०२० चे १३ वे सत्र सुरु होण्यापासून अवघे काही दिवस शिल्लक आहेत. स्पर्धेतील पहिला सामना चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेतेपद ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचं रनसंग्राम होणार आहे.

IPL च्या नव्या वेळापत्रकानुसार, १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स दरम्यान पहिला सामना होणार आहे. त्यानंतर ३ नोव्हेंबपर्यंत प्रत्येक संघाचे एकमेकांबरोबर सामने होतील. आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या वेळापत्राकानुसार २४ सामने दुबई, २० सामने अबूदाबी आणि १२ सामने शारजामध्ये होणार आहेत. बीसीसीआयने साखळी सामन्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे