टीम इंडिया विरूद्ध श्रीलंका यांच्यात तिसऱ्या सामन्याची जुगलबंदी, ८ गडी तंबूत परतले ; श्रीलंकेची जिंकण्यासाठी धडपड

टीम इंडियाचे एकूण ८ गडी बाद झाले असून ते तंबूत परतले आहेत. तर टीम इंडियाच्या आतापर्यंत २०० धावा पूर्ण झाल्या आहेत. नवदीप सेैनी आणि राहुल चाहर आता मैदानात खेळण्यासाठी उतरले आहेत. तर संजूने शॉसोबत मिळून १०० धावांचा टप्पा पूर्ण केला.

    टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांची मालिका आज संपणार आहे. पहिले दोन सामने जिंकल्यामुळे टीम इंडियाने ही मालिका आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे आजच्या तिसऱ्या सामन्यातही विजय मिळवून श्रीलंका संघाला व्हाईट वॉश देण्याचा टीम इंडिया प्रयत्न करत आहे. तर  श्रीलंका संघ सुद्धा आजचा सामना जिंकण्यासाठी जीवाचे रान करत आहे.

    टीम इंडियाचे एकूण ८ गडी बाद झाले असून ते तंबूत परतले आहेत. तर टीम इंडियाच्या आतापर्यंत २०० धावा पूर्ण झाल्या आहेत. नवदीप सेैनी आणि राहुल चाहर आता मैदानात खेळण्यासाठी उतरले आहेत. तर संजूने शॉसोबत मिळून १०० धावांचा टप्पा पूर्ण केला.

    श्रीलंकेचे गोलंदाज प्रवीण जयविकरामा आणि अकिला धनंजय यांनी ३-३ विकेट घेतले. तर दुष्मंथ चमीरा आणि दासुन शनाकाला १-१ विकेट घेण्यास यश मिळाले आहे. सामना सुरू असताना मध्येच पाऊस पडल्यामुळे सामना दीड तास थांबवण्यात आला होता. परंतु त्यानंतर टीम इंडियाने ३८ धावांच्या आतच ५ गडी स्वस्तात बाद झाले. यामध्ये मनीष पांडे, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, कृष्णप्पा गौतम आणि नितीश राणा यांसारखे खेळाडू स्वस्तात बाद झाले. हे पाचही विकेट्स श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी घेतले आहे. २५ व्या ओव्हरपर्यंत टीम इंडियाचा स्कोर ३ विकेट वर १५७ रन इतका होता.