‘या’ गोष्टीमुळे मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढण्याची शक्यता ?

गेल्यावर्षी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) जेतेपदाचा चौकार मारला होता. पण यावर्षी मात्र एका गोष्टीमुळे मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढलेली आहे. तसेच या गोष्टीमुळे मुंबईच्या संघाचे या आयपीएलमध्ये (IPL 2020) नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण सध्याच्या घडीला मुंबईचा संघ (Mumbai Team) हा समतोल नसल्याचे पाहायला मिळत आहे.

अबुधाबी : गेल्यावर्षी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) जेतेपदाचा चौकार मारला होता. पण यावर्षी मात्र एका गोष्टीमुळे मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढलेली आहे. तसेच या गोष्टीमुळे मुंबईच्या संघाचे या आयपीएलमध्ये (IPL 2020) नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण सध्याच्या घडीला मुंबईचा संघ (Mumbai Team) हा समतोल नसल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईच्या संघात धडाकेबाज फलंदाज आहेत. तसेच चांगले अष्टपैलू क्रिकेटपटूही आहेत. त्याचबरोबर तीन ते चार वेगवान गोलंदाजही आहेत. परंतु जी गोष्ट युएईमधील खेळपट्ट्यांसाठी महत्त्वाची असते ती नक्कीच नसल्याचे पाहायला मिळत आहे. युएईमधील खेळपट्ट्या या फिरकी गोलंदाजीला पोषक असल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यामुळे प्रत्येक संघाने आपल्या ताफ्यात नावाजलेले फिरकीपटू ठेवलेले आहेत. पण हीच गोष्ट मुंबईच्या संघात पाहायला मिळत नाही. कारण मुंबईच्या संघात एकही नावाजलेला फिरकीपटू नसल्याचेच पाहायला मिळत आहे. यामुळे संघाला मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.