मुंबई विद्यापीठाचे डॉ विश्वंभर जाधव यांना यंदाचा आचार्य चाणक्य शिक्षाविद पुरस्कार जाहीर

मुंबई : मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या खेळ दिनाचे औचित्य साधून आचार्य चाणक्य शिक्षाविद पुरस्कार २०२० वितरण करण्यात आले. यंदा हा पुरस्कार मुंबई विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागाचे प्राध्यापक डॉ विश्वंभर जाधव यांना प्राप्त झालेला आहे.

या संस्थेच्या प्रमुख रचना भीष्मराजका यांनी सरांच्या पुरस्कारासाठी नामांकन केलं होतं. या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातून मानकरी निवडण्यात आले. डॉ विश्वंभर जाधव यांना संशोधन कार्यात, प्रशिक्षण क्षेत्रात, शारीरिक शिक्षण विभागात त्यांनी जी भरीव कामगिरी केली आहे. त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

विश्वंभर जाधव हे मुंबई विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते मुंबई विद्यापीठ जिमखान्याचे अध्यक्षही आहेत. मुंबई विद्यापीठ शिक्षक संघटना उमासाचेही ते उपाध्यक्ष आहेत. त्यांना हा पुरस्कार फन टु अर्न या संस्थेतर्फे जाहीर झालेला आहे. या पुरस्काराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी संपूर्ण भारतातून ५०१ जणांची निवड झालेली असून या पुरस्काराची युनायटेड किंग्डम या वर्ल्ड बुक रेकार्ड मध्ये ही याची नोंद झालेली आहे म्हणून या पुरस्काराचे एक विशेष असे महत्त्व आहे. या आधीही डॉ. विश्वंभर जाधव यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांना दोनदा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा ऑनलाइन संपन्न झाला. यासाठी गुगल फॉममध्ये संपूर्ण माहिती भरून घेण्यात आली होती. माहितीच्या आधारे निवड करून मग त्यांचे नामांकन करण्यात आले आहे. डॉ. विश्वंभर जाधव यांनी आजवर शालेय पातळीपासून ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे.