अँडरसनने भारताला दिला दुसरा झटका, के.एल.राहुलनंतर पुजाराही तंबूत परत

फलंदाजीसाठी रोहित शर्मा आणि केएल राहुल ही जोडी मैदानात उतरली असता पहिल्याच षटकात केएल राहुल बाद झाला. त्यानंतर काही वेळातच पुजाराही बाद होऊन तंबूत परतला आहे.

    टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटीतील तिसऱ्या सामन्याला सुरूवात झाली आहे. टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत सामन्यात १५१ धावांनी विजय मिळवून १-० अशी आघाडी मिळवली. परंतु आज सुरू होणाऱ्या तिसऱ्या सामन्यामध्ये टीम इंडिया जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न करणार आहे.

    फलंदाजीसाठी रोहित शर्मा आणि केएल राहुल ही जोडी मैदानात उतरली असता पहिल्याच षटकात केएल राहुल बाद झाला. त्यानंतर काही वेळातच पुजाराही बाद होऊन तंबूत परतला आहे.

    टीम इंडियाला अजून एक झटका बसला आहे. केएल राहुल पाठोपाठ भारताचा खेळाडू पुजाराही जेम्स अँडरसनच्या चेंडूवर पुजारा बाद झाला आहे. राहुलप्रमाणे बटलरनेच त्याचा झेल घेतला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच षटकात जेम्स अँडरसनने टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलला तंबूत धाडलं आहे.