मुंबई आणि हैदराबाद यांच्यात आज होणार ‘कांटे की टक्कर’, ४ स्थान गाठण्यासाठी २००पेक्षा अधिक धावांची गरज

प्ले-ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर मुंबईला 200 पेक्षा जास्त धावा केल्यावर 170 धावांनी सामना जिंकावा लागेल. जर मुंबईने नंतर फलंदाजी केली, तर हैदराबादला अत्यंत कमी धावसंख्येवर रोखल्यानंतर त्यांना फार कमी षटकांमध्ये सामना जिंकावा लागेल.

    पाच वेळा विजेता संघ असलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians Vs Sunrisers Hyderabad) आज (शुक्रवार) आयपीएल 2021 हंगामातील शेवटचा साखळी सामना खेळेल. मुंबईचा सामना हैदराबादशी आहे. गुरुवारी कोलकाताच्या (KKR) राजस्थानवर 86 धावांनी विजय मिळवल्यानंतर मुंबईच्या प्लेऑफमध्ये (Play Off) जाण्याची शक्यता जवळजवळ संपली आहे.

    हैदराबादवर विजय मिळवल्यास मुंबई देखील 14 गुणांवर कोलकाताच्या बरोबरीची असेल, परंतु दोन्ही संघांच्या निव्वळ धावगतीतील फरक इतका मोठा आहे की, मुंबईला तो पुसणे जवळजवळ अशक्य आहे. हैदराबाद (SRH) संघ आधीच प्लेऑफच्या बाहेर आहे. शुक्रवारी दोन सामने खेळले जाणार आहेत आणि दोन्ही सामने एकाच वेळी संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होतील.