आज राजस्थान आणि पंजाबमध्ये झुंज! राहुल ब्रिगेडलाही लागली विजयाची आस

स्टीवन स्मिथऐवजी संजू सॅमसनकडे राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सोपवण्यात आल्यामुळे त्याच्या नेतृत्वाचा कस लागणार हे निश्चित आहे. लोकेश राहुलची ब्रिगेडही विजयासाठी जिवाचे रान करताना दिसेल.

    आयपीएलच्या यंदा सुरू असलेल्या मोसमात आज याच दोन संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. याप्रसंगी दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसतील. स्टीवन स्मिथऐवजी संजू सॅमसनकडे राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सोपवण्यात आल्यामुळे त्याच्या नेतृत्वाचा कस लागणार हे निश्चित आहे. लोकेश राहुलची ब्रिगेडही विजयासाठी जिवाचे रान करताना दिसेल.

    राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यामध्ये आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत २१ लढती पार पडल्या आहेत. राजस्थान रॉयल्सने १२ लढतींमध्ये विजय मिळवून आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

    दोन्ही संघांचा संभाव्य चमू खालीलप्रमाणे

    राजस्थान रॉयल्स – जोस बटलर (यष्टिरक्षक), यशस्वी जैसवाल, संजू सॅमसन (कर्णधार), मनन वोहरा, बेन स्टोक्स, ख्रिस मॉरिस, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी, मयांक मार्पंडे.

    पंजाब किंग्ज – ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक), निकोलस पूरण, मनदीप सिंग, जलाज सक्सेना, मोयसेस हेनरीक्स, इशान पोरेल, रवी बिष्णोई, मोहम्मद शमी, जाय रिचर्डसन.