कोहली विरूद्ध धोनी! आज RCB vs CSK ऐकमेकांना भिडणार, आरसीबीपुढे कडवे आव्हान

केकआर(KKR) विरूद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात आरसीबीचा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे विराटच्या कर्णधार पदावर खिल्ली उडवली गेली. तोच चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) संघ पाहिला असता, माजी कर्णधार आणि कॅप्टनकूल महेंद्रसिंग धोनीने जबरदस्त फॉर्ममध्ये कमबॅक केलं असून मुंबई इंडियन्सवर (MI)  दणदणीत विजय मिळवला होता.

    शारजा :  आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज (RCB vs CSK) यांच्यात आज सामना रंगणार आहे.  म्हणजेच कोहली विरूद्ध धोनी (Captain Kohli Vs Dhoni) असा हा सामना होणार आहे. केकआर(KKR) विरूद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात आरसीबीचा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे विराटच्या कर्णधार पदावर खिल्ली उडवली गेली. तोच चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) संघ पाहिला असता, माजी कर्णधार आणि कॅप्टनकूल महेंद्रसिंग धोनीने जबरदस्त फॉर्ममध्ये कमबॅक केलं असून मुंबई इंडियन्सवर (MI)  दणदणीत विजय मिळवला होता.

    आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात (In the second session of IPL 2021) आणि सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूला चेन्नईच्या विरूद्ध खेळताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. आरसीबीला गुणतालिकेत पहिल्या चार संघांत स्थान मिळवायचे झाल्यास त्यांच्या फलंदाजांना चांगला खेळ करावाच लागेल.

    देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली या सलामीवीरांकडून चांगली सुरुवात अपेक्षित आहे. मधल्या फळीकडूनही संघाला मदत मिळताना दिसत नाही. केकेआरविरुद्ध त्यांची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.
    दुसरीकडे चेन्नईचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने मुंबईविरुद्ध ५८ चेंडूत शानदार ८८ धावा ठोकल्या. डुप्लेसिस आणि मोईन अली यांना खाते उघडण्यात अपयश आले तर अंबाती रायडू जखमी होऊन परतला होता.