आज बॉक्सर सतीश कुमार कामगिरीकडे देशाचे लक्ष

गोल्फ आणि घोडेस्वारी व्यतिरिक्त, आज बॉक्सर सतीश कुमार आपला उपांत्यपूर्व सामना खेळण्यासाठी सज्ज आहे.

    टोकियो ऑलिम्पिकमधील काल (शनिवार)चे भारताचे खेळातील सादरीकरण काहीसे आनंददायी तर काहीसे निराशाजनक राहिले. भारतीय महिला हॉकी संघ आणि डिस्कस थ्रोअर कमलप्रीत कौरच्या विजयाने भारतीयांना आनंद दिला. तर दुसरीकडे जागतिक क्रमवारीतील बॉक्सर अमित पंघाल आणि स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूच्या पराभवामुळे चाहत्यांच्या सुवर्ण पदकाच्या आशा मावळल्या.

    आज भारत जास्त सामने खेळणार नाहीय. गोल्फ आणि घोडेस्वारी व्यतिरिक्त, आज बॉक्सर सतीश कुमार आपला उपांत्यपूर्व सामना खेळण्यासाठी सज्ज आहे.त्यामुळे सतिश कुमारच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.