दिव्यांशची ऑलिम्पिक तयारी : पबजीच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी वडिलांनी दिव्यंशला शुटिंगच्या रेंजवर पाठवले; ISSF विश्वचषकात ठरलाय चार सुवर्णपदकांचा मानकरी

राजस्थानातील जयपूर येथील रहिवासी असलेल्या दिव्यांशला लहानपणापासूनच शुटिंगची आवड होती. यामुळे, वयाच्या १२ व्या वर्षी त्याला ऑनलाइन गेम PUBG खेळण्याची सवय झाली. या व्यसनातून मुक्त होण्यासाठी त्याचे वडील अशोक पंवार यांनी दिव्यांशसह मोठी बहीण मानवी यांना जयपूरमधील जंगपुरा शुटिंग रेंजमध्ये पाठवायला सुरुवात केली.

  दिव्यंश सिंह पनवार याने बीजिंगमधील २०१९ च्या ISSF विश्वचषकात १० मीटर एअर रायफलमध्ये टोकियो ऑलिम्पिकसाठी स्थान पटकावण्यासाठी रौप्यपदक जिंकले. दिव्यांशने आतापर्यंत चार आयएसएसएफ विश्वचषकात सुवर्ण पदके पटकावली आहेत. ज्युनियर वर्ल्ड कपमध्येही त्याने देशासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. त्याचबरोबर त्याने ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये रेकॉर्डही केले आहेत. तो टोकियोमध्ये पदक जिंकेल अशी अपेक्षा आहे.

  राजस्थानातील जयपूर येथील रहिवासी असलेल्या दिव्यांशला लहानपणापासूनच शुटिंगची आवड होती. यामुळे, वयाच्या १२ व्या वर्षी त्याला ऑनलाइन गेम PUBG खेळण्याची सवय झाली. या व्यसनातून मुक्त होण्यासाठी त्याचे वडील अशोक पनवार यांनी दिव्यांशसह मोठी बहीण मानवी यांना जयपूरमधील जंगपुरा शुटिंग रेंजमध्ये पाठवायला सुरुवात केली. मात्र, नंतर प्रशिक्षक दीपक कुमार दुबे यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणासाठी त्यांना दिल्लीच्या करणीसिंह शुटिंग रेंज येथे पाठविण्यात आले. दिव्यंशने एका मुलाखतीत असेही म्हटले आहे की तो PUBGचा दिवाना झाला होता, परंतु आता देशासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे त्याचे लक्ष्य आहे.

  आई आणि बाबा आहेत नर्सिंग स्टाफ

  दिव्यंशचे वडील अशोक पनवार जयपूरच्या सवाई मानसिंग मेडिकल कॉलेजमध्ये वरिष्ठ नर्सिंग स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. आई निर्मला देवी देखील परिचारिका आहेत. त्या घरी मेडिकल स्टोअर चालवतात.

  अभिनव बिंद्रा आहे आदर्श

  दिव्यंश बीजिंग ऑलिम्पिक २००८ मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अभिनव बिंद्राला आपला आदर्श मानतो. त्याने एका मुलाखतीत असेही म्हटले आहे की, अभिनव बिंद्राला टीव्हीवर पदक जिंकताना पाहिले आहे, त्याचप्रकारे देशासाठी पदक जिंकण्याचीही त्याचीही इच्छा आहे.

  दिव्यांशने२०१९ मध्ये ISSF विश्वचषकात ६ पदके जिंकली ज्यामध्ये चार सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्यपदकांचा समावेश आहे. त्याने १० मीटर एअर रायफलमध्ये वैयक्तिकरित्या एक सोने आणि एक रौप्यपदक जिंकले. मिश्र दुहेरीत त्याने ३ सुवर्ण व एक कांस्यपदक जिंकले.

  ज्युनियरमध्ये जिंकली आहेत तीन पदके

  दिव्यंशने ज्युनियर वर्ल्ड शुटिंग चॅम्पियनशिप आणि ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये दोन सुवर्णांसह तीन पदके जिंकली आहेत. २०१८ मध्ये ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये झालेल्या मिश्र स्पर्धेत त्याने कांस्यपदक जिंकले. विश्वचषकात दोन सुवर्ण पदके जिंकली आहेत.

  tokyo olympics 2021 interesting facts about indian shooter divyansh singh panwar