टोकियो ऑलिम्पिक प्रेक्षकांविना होणार ? अध्यक्षांनी दिले संकेत

जपानमध्ये कोरोनाची नवी लाट आल्याने आयोजकांनी हा निर्णय जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. पुढेही अशीच परिस्थिती राहिल्यास आम्हाला प्रेक्षकांविनाच ऑलिम्पिकचे आयोजन करावे लागू शकेल, असे हाशिमोटो एका मुलाखतीत म्हणाल्या.

    आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) आणि आयोजकांचा ही स्पर्धा प्रेक्षकांसह घेण्याचा मानस होता. परंतु जपानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने आता टोकियो ऑलिम्पिक प्रेक्षकांविना घेणे भाग पडू शकेल, असे संकेत टोकियो २०२० च्या अध्यक्षा सेइको हाशिमोटो यांनी दिले आहेत.

    सहभागी झालेले खेळाडू आणि जपानचे लोक पूर्णपणे सुरक्षित राहिले तरच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली असे म्हणता येईल, असेही हाशिमोटो यांनी स्पष्ट केले. जगभरात कोरोनाने थैमान घातल्याने परदेशी प्रेक्षकांवर याआधीच बंदी घालण्यात आली होती.

    जपानच्या नागरिकांना ऑलिम्पिक पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश देण्याबाबतचा निर्णय या आठवड्यात घेण्यात येणार होता. परंतु, आता जपानमध्ये कोरोनाची नवी लाट आल्याने आयोजकांनी हा निर्णय जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. पुढेही अशीच परिस्थिती राहिल्यास आम्हाला प्रेक्षकांविनाच ऑलिम्पिकचे आयोजन करावे लागू शकेल, असे हाशिमोटो एका मुलाखतीत म्हणाल्या.