१६ नोव्हेंबरपासून देशांतर्गत टेनिस स्पर्धा सुरू करण्याचा प्रयत्न?

विविध वयोगटांच्या देशांतर्गत टेनिस स्पर्धांना १६ नोव्हेंबरपासून ( tennis tournament from November 16) प्रारंभ होईल, असे अखिल भारतीय टेनिस संघटनेकडून सांगण्यात आले. सुरुवातीला १२, १४ आणि १६ वर्षांखालील स्पर्धाच्या आयोजनाचा ‘एआयटीए’चा प्रयत्न आहे.

कोरोनाच्या काळात (Corona Virus)  प्रवासाचा धोका पत्करला जाऊ नये म्हणून राज्यांतर्गत स्पर्धेचे (tennis tournament ) आयोजन करण्यावर सध्या ‘एआयटीए’चा भर आहे. त्यामुळे राज्यात जिल्ह्यांतर्गत स्पर्धेचे आयोजन करावे का, याचा निर्णय संबंधित राज्य टेनिस संघटना घेतील, असे ‘एआयटी’ने (AIT) स्पष्ट केले आहे.

विविध वयोगटांच्या देशांतर्गत टेनिस स्पर्धांना १६ नोव्हेंबरपासून ( tennis tournament from November 16) प्रारंभ होईल, असे अखिल भारतीय टेनिस संघटनेकडून सांगण्यात आले. सुरुवातीला १२, १४ आणि १६ वर्षांखालील स्पर्धाच्या आयोजनाचा ‘एआयटीए’चा प्रयत्न आहे. सरकारच्या सध्याच्या नियमावलीनुसार टेनिसच्या देशांतर्गत स्पर्धा १६ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे ‘एआयटीए’ने स्पष्ट केले आहे. क्रीडा प्रकाराचे राष्ट्रीय सराव शिबीर पुन्हा लांबणीवर टाकण्यात आले आहे.

भारतीय टेबल टेनिस महासंघाची (टीटीएफआय) मान्यता सध्या सरकारकडून काढून घेण्यात आली आहे. परिणामी सरकारकडून खेळाडूंना एका छताखाली आणण्याचा प्रयत्न ऑगस्टपासून सुरू आहे. तसेच कोरोनाकाळात भारतात फुटबॉल पुन्हा सुरू करण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे, असे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.